Prakash Ambedkar । राजकारणातून मोठी बातमी! प्रकाश आंबेडकर यांना मोठा धक्का

Prakash Ambedkar

Prakash Ambedkar । लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections) राज्यामध्ये महाविकास आघाडी विरोधात महायुती असे चित्र दिसत आहे. दोन्ही आघाड्यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार शक्तीप्रदर्शन सुरू केला आहे. त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीने देखील अनेक ठिकाणी आपले उमेदवार जाहीर केले असून शक्तीप्रदर्शन सुरू केले आहे. मात्र सध्या प्रकाश आंबेडकर यांना एक धक्का देणारी बातमी समोर आली आहे. अमरावती मधून ही बातमी समोर आली आहे.

Lok Sabha Election । निवडणुकीपूर्वी पुन्हा महाविकास आघाडीला मोठा धक्का! ‘या’ आमदाराने दिला राजीनामा

वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शैलेश गवई यांनी काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांना पाठिंबा दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अमरावती जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का बसला आहे. वंचितच्या मतविभाजनामुळे भाजपच्या उमेदवाराला फायदा होऊ नये यासाठी आपण काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांना पाठिंबा दिला असल्याचे शैलेश गवई यांनी म्हटले आहे.

Rohit Pawar । “अजित पवारांना भाजपनं लोकल नेता बनवलं,” रोहित पवारांची जहरी टीका

दरम्यान, अमरावतीमध्ये चौरंगी लढत होणार आहे. भाजपने नवनीत राणा यांना उमेदवारी दिली आहे तर काँग्रेसकडून बळवंत वानखेडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्याचबरोबर प्रहारने देखील या मतदारसंघांमध्ये आपला उमेदवार उभा केला आहे तर दुसरीकडे रिपब्लिक सेनेकडून आनंदराज आंबेडकर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. वंचितने रिपब्लिकन सेनेला पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र असं असताना देखील शैलेश गवई यांनी काँग्रेसला पाठिंबा दिल्याने वंचितमध्ये मोठी फूट पडल्याचे समोर आले आहे.

Uddhav Thackeray । उद्धव ठाकरेंच्या दाव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ; म्हणाले, “देवेंद्र फडणवीसांनी मला…”

Spread the love