Mumbai Crime । गेल्या 10 वर्षांपासून आजोबां करत होते मुलीसोबत नको ते कृत्य; अखेर तिने सांगितले सत्य नंतर कुटुंबीयांनी…

Mumbai Crime

Mumbai Crime । आजोबा आणि नातवाच नातं हे जगातील सर्वच नात्यांपेक्षा खूप भारी असत. आपल्या नातवंडांचे लाड पुरवण्याचे काम आजोबा करतात. नातवंडांना चांगल्या गोष्टी शिकवणे त्यांच्यावर चांगले संस्कार करणे हे आजोबांचे काम असते. मात्र सध्या या नात्याला काळिमा फासणारी एक घटना समोर आली आहे. यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. मुंबईतून आजोबा आणि नातवंडांच्या नात्याला तडा देणारे एक प्रकरण समोर आले आहे.

Lok Sabha Election । निवडणुकीपूर्वी पुन्हा महाविकास आघाडीला मोठा धक्का! ‘या’ आमदाराने दिला राजीनामा

मुंबई या ठिकाणी एक आजोबा मागच्या 10 वर्षांपासून आपल्या नातीवर बलात्कार करत होता. पीडितेच्या म्हणण्यानुसार, ती 9 वर्षांची असल्यापासून तिचे आजोबा तिच्यासोबत असे करत होते. एवढेच नाही तर आरोपी आजोबांनी पीडित नातीला कोणाला काही सांगितले तर जीवे मारण्याची धमकीही दिली. आता 10 वर्षांनंतर पीडितेने संपूर्ण हकीकत तिच्या कुटुंबियांना सांगितली, त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

Rohit Pawar । “अजित पवारांना भाजपनं लोकल नेता बनवलं,” रोहित पवारांची जहरी टीका

आरोपी वृद्धाहा 58 वर्षांचा आहे. पीडितेचे वय १९ वर्षे आहे. पीडितेच्या म्हणण्यानुसार, हा तिचा सावत्र आजोबा आहे, जो 2014 पासून तिच्यासोबत ही भयानक घटना करत होता. त्यावेळी पीडितेचे वय अवघे 9 वर्षे होते. आरोपी पीडितेच्या घरापासून हाकेच्या अंतरावर राहतो. सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे.

Uddhav Thackeray । उद्धव ठाकरेंच्या दाव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ; म्हणाले, “देवेंद्र फडणवीसांनी मला…”

Spread the love