Sharad Pawar । धक्कादायक प्रकार! सभेत भाषण देताना शरद पवारांकडे उपस्थितांनी फेकली अज्ञात वस्तू, पण बॉडीगार्डने…

Sharad Pawar

Sharad Pawar । बारामती मतदारसंघात (Baramati Constituency) यंदा अटीतटीची लढत पार पडणार आहे. कारण पहिल्यांदाच या मतदासंघात (Baramati Loksabha Election) नणंद विरुद्ध भावजय असा हाय व्होल्टेज सामना रंगणार आहे. खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार (Supriya Sule Vs Sunetra Pawar) यांच्या लढतीत कोणाचा विजय होणार? याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. शरद पवार गट आणि अजित पवार गट दोन्ही गटाकडून जोरदार शक्तिप्रदर्शन सुरु आहे.

Ajit Pawar । उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निवडणूक सभेत सर्वात मोठे आव्हान; म्हणाले…

दरम्यान, शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे यांनी काल पुणे येथे बारामती लोकसभा (Baramati Loksabha) मतदारसंघातून उमेदवारीचा अर्ज भरला आहे. त्यानंतर लगेचच शरद पवार ऍक्शन मोडमध्ये आले असून सभा घेण्यास सुरवात केली. शरद पवार यांनी काल बारामती होमग्राऊंडला भेट दिली. यावेळी सभेत ते बोलत असताना उपस्थितांमधून एकाने शरद पवार यांच्या अंगावर एक वस्तू फेकल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

Ajit Pawar । अजित पवारांच्या भाषणादरम्यान माजी आमदाराला आली भोवळ, तातडीने रुग्णालयात दाखल

शरद पवार सभेत बोलत असताना, उपस्थितांकडून शरद पवार यांच्याकडे माईक फेकण्यात आला. मात्र शरद पवार यांच्यामागे उभा असलेल्या बॉडीगार्डने माईक पकडला पण घडलेल्या प्रकारावर शरद पवार यांच्या मागे उभा असणाऱ्या बॉडीगार्डच्या चेहऱ्यावर राग पाहायला मिळाला. याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.

Chhagan Bhujbal। बिग ब्रेकिंग! छगन भुजबळांची लोकसभेतुन माघार

Spread the love