Ajit Pawar । पुणे अपघात प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवार यांच्या गंभीर आरोप केले आहेत. अजित पवारांची नार्को टेस्ट अर्थात ब्रेन मॅपिंग करण्याची मागणी केली दमानिया यांनी केली आहे. यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. अजित पवारांचा फोन जप्त करुन नार्को टेस्ट करा, असं अंजली दमानिया म्हणाल्या आहेत.
ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर करत त्यांनी अजित पवारांवर गंभीर आरोप केले आहेत. त्याचबरोबर त्यांनी अजित पवार यांना काही प्रश्न देखील विचारले आहेत.
१. पालक मंत्री म्हणून, आरोपींना शिक्षा व्हावी म्हणून तुम्ही ठिय्या देऊन सीपी ऑफिस मधे का नाही बसलात ?
२. जेव्हा फडणवीसांनी पत्रकार परिषद घेतली तेव्हा पुण्याचे पालक मंत्री म्हणून आणि उपमुख्यमंत्री म्हणून तुम्ही त्यांचा बाजूला का नव्हतात ?
३. कुठलीही प्रक्तिक्रिया द्यायला ४ दिवस का लागले ? ते पण पत्रकारांनी प्रश्न विचारला नंतर का बोललात ?
४. घटना घडली तेव्हा तुम्ही कुठे होतात ?
५. तुमचे आणि अग्रवाल कुटुंबाचे आर्थिक संबंध होते का ?
शुल्लक गोष्टींवर भडकणारे अजित पवार, आज पत्रकार परिषदेत गांगरल्यासारखे का होते. जर आरोप खोटे होते तर ते भडकले कसे नाहीत ?
बऱ्याच गोष्टी बाहेर येतील. असं ट्विट करत अंजली दमानिया म्हणाल्या आहेत.
अजित पवारांना काही प्रश्न
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) May 27, 2024

३. कुठलीही…