‘जन्नत’चा प्रवास झाला नरकाचा प्रवास, धोकादायक लाटांमध्ये 100 जणांना घेऊन जाणारी बोट बुडाली, धक्कादायक व्हिडिओ आला समोर

Viral News

कॅरिबियनमध्ये (Caribbean) एक अतिशय सुंदर देश आहे, ज्याचे नाव बहामास आहे. हे अनेक लहान लहान बेटांचे बनलेले आहे. बहामास (Bahamas City) हे सुंदर समुद्रकिनारे आणि निळ्या महासागराच्या पाण्यासाठी ओळखले जाते. त्यामुळे येथे प्रवासी मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात. तथापि, बहामास भेट देणाऱ्या काही प्रवाशांसाठी हा प्रवास जीवन आणि मृत्यू यांच्यातील प्रवास बनला. याचे कारण म्हणजे त्यांची बोट समुद्रात उलटली, त्यात एकाचा मृत्यू झाला. (The boat capsized in the sea)

Gmail Alert । सावधान! तुमचेही पुढच्या महिन्यात बंद होईल Gmail अकाऊंट, नेमकं कारण काय?

सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक पर्यटक बोट पाण्यात बुडताना दिसत आहे. हे सर्व लोक रॉयल कॅरेबियन लक्झरी क्रूझ जहाजातून पर्यटक बोटीतून ब्लू लगून नावाच्या बेटावर जात होते. मात्र वाटेत त्यांची बोट उलटली. हा अपघात 14 नोव्हेंबर रोजी घडल्याचे सांगण्यात येत आहे. पर्यटकांना खाजगी ब्लू लगून बेटावर नेले जात होते. या अपघातात अमेरिकेतील रहिवासी असलेल्या महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Viral Video । वडिलांना अचानक हृदयविकाराचा झटका, सैनिक मुलाने केलं असं काही की…सर्वजण पाहतच राहिले

अपघात कसा झाला?

मिळालेल्या माहितीनुसार, पर्यटक बोटीने प्रवास सुरू केला तेव्हा वाटेत धोकादायक लाटांचा सामना करावा लागला. यावेळी बोटीत 100 हून अधिक लोक होते. बोट लाटांचा सामना करू शकली नाही आणि नंतर ती बुडू लागली. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, मृत्यू झालेली 74 वर्षीय महिला अमेरिकेतील कोलोरॅडो येथील रहिवासी होती. पाच दिवसांच्या सुट्टीवर ती कुटुंबासह येथे आली होती.

Free Food Offer । आधार कार्ड दाखवा अन् फुकट जेवा, ‘या’ हॉटेलमध्ये ‘मनोज’ नावाच्या लोकांसाठी एक मोफत जेवण

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये पर्यटक बोट एकप्रकारे झुकू लागल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे बोटीतील लोक ओरडत आहेत. काही लोक लाइफ जॅकेट घातलेलेही दिसतात. बहुतेक लोकांनी लाइफ जॅकेट घातले होते, त्यामुळे ते पाण्यात बुडाले तेव्हा लगेचच बचावले. बोट एका बाजूला झुकू लागल्याने वयोवृद्ध आणि लहान मुलांना सर्वाधिक त्रास होत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

Mumbai News । मुंबईत बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात तुफान राडा

Spread the love