Aditya Thackeray । सध्या एक मोठी बातमी समोर आली आहे. ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) अडचणीत येणार असल्याची माहिती समोर आली आहे. बेकायदेशीर जमाव जमवून पुलाचे उद्घाटन केल्याप्रकरणी आदित्य ठाकरे आणि ठाकरे गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईमधील एन एम जोशी पोलीस स्थानकात गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी हा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती मिळत आहे. (Municipal Corporation of Mumbai)
नेमकं काय आहे प्रकरण?
मुंबई या ठिकाणी लोअर परेल उडान पुलाची एक मार्गीका सुरू करण्यात आली होती. मात्र दुसऱ्या मार्गीकेचे काम देखील सुरू होते. हा फुल सुरू करण्यासंदर्भात यापूर्वी देखील अनेक वेळा डेडलाईन दिल्या होत्या. मात्र या पुलाच्या दुसऱ्या मार्गिकेचे काम अजूनही पूर्ण झाले नव्हते. हे काम रखडल्यामुळेच गुरुवारी आदित्य ठाकरे यांच्याकडून याचे उद्घाटन करण्यात आले. त्यामुळे परेल पुलाचे उद्घाटन केल्याप्रकरणी आदित्य ठाकरे आणि ठाकरे गटाचे नेते आणि पदाधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Gmail Alert । सावधान! तुमचेही पुढच्या महिन्यात बंद होईल Gmail अकाऊंट, नेमकं कारण काय?
हा गुन्हा दाखल करण्यासाठी मुंबई पालिकेचे दोन अधिकारी एन एम जोशी पोलीस स्थानकात रात्री ११ वाजून ४५ मिनिटांनी दाखल झाले होते. रात्री तीन वाजेपर्यंत हे अधिकारी पोलीस ठाण्यात आले होते. याप्रकरणी पोलिसांनी दोन अधिकाऱ्यांचा जबाब नोंदवला आहे. त्यानंतर आदित्य ठाकरे आणि इतर पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुलाचे काम अपूर्ण असतानाच बेकायदेशीरपणे उद्घाटन कसे केले? आम्ही तीन-चार दिवसात काम पूर्ण करून ही मार्गिका सुरू करणार होतो. अशी भूमिका मुंबई मनपाने घेतली आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
Viral Video । वडिलांना अचानक हृदयविकाराचा झटका, सैनिक मुलाने केलं असं काही की…सर्वजण पाहतच राहिले