Firecracker Market Fire Video । मोठी दुर्घटना! फटाका मार्केटमध्ये अचानक आग, काही क्षणातच २६ दुकानं पेटली; १२ जण होरपळले

Firecracker Market Fire Video

Firecracker Market Fire Video । दिवाळीच्या दिवशी मथुरेतील गोपाळबाग भागात असलेल्या फटाका मार्केटला भीषण आग लागली. काही वेळातच आगीने अनेक दुकाने जळून खाक झाली. या अपघातात १२ जण गंभीर भाजले आहेत. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलीस आणि स्थानिक लोकांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. (Latest Marathi News)

social media video । व्हिडिओ शेअर करणाऱ्यांनो सावधान! बनावट असल्यास जावे लागणार तुरुंगात; जाणून घ्या कायदा

याबाबत अधिकची माहिती अशी की, मथुरा शहरातील गोपाळबाग या ठिकाणी एका फटाक्याच्या दुकानात अचानक रॉकेट शिरलं अन् बघता-बघता २६ दुकानं पेटली. या ठिकाणी अचानक आग लागल्यामुळे तेथे फटाके खरेदी करण्यासाठी आलेल्या लोकांची मोठी तारांबळ उडाली. ही आग एवढी भीषण होती, की घटनेमध्ये १२ जण होरपळले. (Firecracker Market Fire Video)

Sharad Pawar । शरद पवार मराठा की ओबीसी?, शाळा सोडल्याचा दाखला सोशल मीडियावर व्हायरल

या घटनेची माहिती मिळताच अग्निमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जातंय.

Sharad Pawar । बिग ब्रेकिंग! शरद पवार यांची अचानक प्रकृती बिघडली

या आगीने रौद्ररूप धारण केले होते त्यामुळे अग्निशमन दलाच्या तब्बल २ तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र फटाक्यांचं अख्ख मार्केट जळून खाक झालं आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.

Sharad Pawar । महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भुकंप, पुतण्याला भेटल्यावर शरद पवार काय म्हणाले?

Spread the love