Maharashtra Politics । महायुतीमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections) जागा वाटपाच्या मुद्द्यावर चर्चा सुरु आहे. लवकरच जागा वाटपाचा तिढा सुटेल. पण यंदाची निवडणूक अटीतटीची असणार आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार गटाला (Ajit Pawar Group) मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण बडा आमदार सीबीआयच्या (CBI) कचाट्यात सापडला आहे. (Latest marathi news)
आमदार यशवंत माने (Yashwant Mane) यांच्यावर एससी जातीची खोटी कागदपत्रे (SC caste fake documents) देऊन तीन पेट्रोल पंप घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी त्यांची चौकशी सीबीआय करणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, यशवंत मानेंविरोधात 17 मे 2022 रोजी मोहोळचे शिंदे गटाचे नेते सोमेश क्षीरसागर (Somesh Kshirsagar) यांनी तक्रार दाखल केली होती.
Politics News । लोकसभेपूर्वी काँग्रेसला मोठं भगदाड! बडा नेता करणार भाजपमध्ये प्रवेश
यशवंत माने यांनी कॉलेज जीवनात विमुक्त जाती कॅटेगिरीतून शिष्यवृत्ती घेतली आहे, असा दावा तक्रारीत केला आहे. तसेच बुलडाणा तालुक्यातील चिखली गावचा रहिवासी असल्याचे दाखवून एससी जातीचा बोगस दाखला आणि व्हॅलिडिटी काढली आहे, असेही तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी सीबीआयने दखल घेतली असून लवकरच माने यांची चौकशी होणार आहे.