Vijay Shivtare । मोठी बातमी! बारामतीत विजय शिवतारे देणार अजितदादांना आव्हान

Vijay Shivtare

Vijay Shivtare । महायुतीमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections) जागा वाटपाच्या मुद्द्यावर चर्चा सुरु आहे. लवकरच जागा वाटपाचा तिढा सुटेल. पण यंदाची निवडणूक अटीतटीची असणार आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी महायुतीचा घटक पक्ष असणाऱ्या अजित पवार गटाला (Ajit Pawar Group) मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी दंड थोपटले आहेत. (Latest marathi news)

Maharashtra Politics । अजित पवारांना मोठा धक्का! ‘हा’ आमदार सीबीआयच्या कचाट्यात, शिंदे गटानेच केली तक्रार

Ads

विजय शिवतारे यांनी पत्रकार परिषद घेतली होती, त्यावेळी त्यांनी आपण बारामतीतून (Baramati Matardar Sangh) अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. याबाबत पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत एकमताने ठराव पास केला, असेही विजय शिवतारे यांनी स्पष्ट केले. विजय शिवतारे यांच्या घोषणेमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

Sharad Pawar । लोकसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीत, बडा नेता करणार पक्षात प्रवेश?

पत्रकार परिषदेत विजय शिवतारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. बोलताना विजय शिवतारे म्हणाले की, “बारामती लोकसभा मतदार संघ हा कोणाचा सातबारा नाही, देशातील ५४३ पैकी एक मतदारसंघ आहे. या ठिकाणी मालकी कोणाची नाही. म्हणून पवार-पवार करण्याएवजी आपण आपला स्वाभीमान जागा करून लढलं पाहिजे. अजित पवारांनी सभ्यतेची नीच पातळी गाठली आहे,” असा गंभीर आरोपही विजय शिवतारे यांनी केला आहे.

olitics News । लोकसभेपूर्वी काँग्रेसला मोठं भगदाड! बडा नेता करणार भाजपमध्ये प्रवेश

Spread the love