Sharad Pawar । लोकसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीत, बडा नेता करणार पक्षात प्रवेश?

Sharad Pawar

Sharad Pawar । खासदार शरद पवार हे लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha election) मैदानात उतरले आहेत. पक्षाचे नाव आणि चिन्ह सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवणे हे त्यांच्या समोर मोठे आव्हान आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्याच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. अशातच आता शरद पवार भाजपला (BJP) मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत. (Latest marathi news)

Politics News । लोकसभेपूर्वी काँग्रेसला मोठं भगदाड! बडा नेता करणार भाजपमध्ये प्रवेश

Ads

भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण (Harishchandra Chavan) शरद पवार गटात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान, मागील काही महिन्यांपासून हरिश्चंद्र चव्हाण हे भाजपासून दूर आहेत. मागील लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदार असताना भाजपाने हरिश्चंद्र चव्हाण यांची उमेदवारी काढून घेत त्यांच्या जागी भारती पवार (Bharati Pawar) यांना उमेदवारी दिली होती. यामुळे हरिश्चंद्र चव्हाण भाजपवर नाराज होते.

Mumbai News । आईला मुलीचं प्रेमप्रकरण समजलं, रागाच्या भरात भयानक पाऊल उचललं; घटना वाचून पायाखालची जमीन सरकेल

ते शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. भाजपाच्या विद्यमान खासदार आणि केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवारांसमोर हरिश्चंद्र चव्हाण मैदानात उतरू शकतात. जर हरिश्चंद्र चव्हाण शरद पवार गटात गेले तर भाजपला दिंडोरी लोकसभेत याचा सर्वात मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे आता हरिश्चंद्र चव्हाण हे शरद पवार गटात जाणार की नाही? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Manoj Jarange Patil । “फडणवीस यांच्या डोक्याला…” नेमकं काय बोलले जरांगे पाटील?

Spread the love