Mumbai News । आईला मुलीचं प्रेमप्रकरण समजलं, रागाच्या भरात भयानक पाऊल उचललं; घटना वाचून पायाखालची जमीन सरकेल

Mumbai News

Mumbai News । दिवसेंदिवस राज्यात गुन्ह्यांचे प्रमाण (Crime News) झपाट्याने वाढत चालले आहे. कायदे कडक करूनही गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाले नाही. हल्ली प्रेमप्रकरणातून अनेक गुन्हे (Crime) घडत आहेत. सध्या अशीच एक घटना घडली आहे. ही घटना जाणून तुमच्याही पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही. काय आहे नेमकं प्रकरण जाणून घेऊयात. (Mumbai Crime News)

Manoj Jarange Patil । “फडणवीस यांच्या डोक्याला…” नेमकं काय बोलले जरांगे पाटील?

प्रेमप्रकरणातून आईने थेट आपल्या पोटच्या मुलीचा जीव घेतला आहे. मुलीच्या प्रेमसंबंधांची जाणीव आईला लागली होती. यावरून मुलगी आणि आईमध्ये वाद सुरु झाला. या वादात मुलीने आईच्या हाताच्या बोटाचा चावा घेऊन तोडले. रागाच्या भरात आईने मुलीची गळा दाबून हत्या केली. (Mother Killed Daughter) त्यानंतर मुलीला फिट आल्याचं सांगून मृत्युचा बनाव रचला.

Vasant More । ब्रेकिंग! वसंत मोरे शरद पवार गटाच्या वाटेवर?

Ads

पण शवविच्छेदन अहवालामुळे सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली. अहवालात मुलीची गळा दाबून हत्या झाल्याचं स्पष्ट झालं. याप्रकरणी निर्मलनगर पोलिसांनी आईवर खूनाचा गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे. मुंबईच्या वांद्रे परिसरात ही धक्कादायक घटना घडली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Bjp । भाजपकडून फाटक्या साड्यांचं वाटप; धक्कादायक व्हिडीओ समोर

Spread the love