येणार …येणार! कापसाला पण ‘अच्छे दिन येणार’; अगामी काळात दर वाढण्याची शक्यता

Will come...will come! 'Good days will come' for cotton too; Rate likely to increase in the near future

राज्यात शेतकऱ्यांसमोर सध्या थकीत वीजबिल आणि मागील हंगामातील नुकसान भरपाई हे मोठे प्रश्न उभे आहेत. महावितरणाने सुरू केलेली वीज तोडणी आणि अजूनही खात्यात जमा न झालेली पीक विम्याची रक्कम यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. अशातच खरीप हंगामातील प्रमुख पिके सोयाबीन ( Soyabean) आणि कापूस ( Cotton) यांना अजूनही हवा तसा दर मिळाला नाही. यामुळे शेतकरी चिंतेत अडकले आहेत. परंतु, येत्या काळात कापसाचे दर वाढतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो.

आनंदाची बातमी! शेतकऱ्यांनी केवळ चालू वीजबिल भरावी अशी सरकारकडून सूचना

दिवाळीनंतर देशात लग्नसोहळ्यांना उत आला आहे. तुळशीची लग्न झाली की महाराष्ट्रात देखील लग्नसराई सुरू होते. येत्या काळात ही संख्या वाढत जाते. याचा फायदा कापसाच्या दरवाढीसाठी होऊ शकतो. लग्नसमारंभांमुळे कपड्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे बाजारात कपड्यांची आणि पर्यायाने सुताची मागणी वाढली की आपोआप कापसाच्या किंमतीत वाढ होणार आहे. (Rates of cotton) देशातील अनेक महत्त्वाच्या बाजारपेठांमध्ये सध्या कापडाची व सुताची मागणी वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

जुळ्या बहिणींसोबत लग्न करणे पडले महागात; नवरदेवाविरोधात पोलिसात गुन्हा दाखल

यामुळे येत्या काळात कापसाला मागणी वाढणार हे नक्की. एकदा बाजारात मागणी वाढली की कापसाच्या किंमती उंचावणार आहेत. सध्या जरी कापसाला हवा असा दर नसला तरी येणारा काळ कापसाला दर देणारा आहे. म्हणून शेतकऱ्यांनी कापसाची विक्री बाजारभाव पाहूनच करावी. असे तज्ञांकडून सांगण्यात येत आहे.

धक्कादायक! एसटी बस आणि कारचा भीषण अपघात; चार जागीच ठार

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *