Accident News । कार आणि दुचाकीचा भीषण अपघात! बहीण-भावाचा जागीच मृत्यू

Accident News । धुळे : अपघाताच्या घटनांनमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. दररोज कुठे ना कुठे भीषण अपघात (Accident) होत आहेत. सध्या देखील अपघाताची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कार आणि दुचाकीच्या भीषण अपघातात बहीण-भावाचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Latest marathi news)

Varsha Gaikwad । काँग्रेसची सर्वात मोठी घोषणा! ‘या’ मतदारसंघातून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साक्री तालुक्यातील वासखेडी शिवारातील खडकी नाल्याजवळ दुचाकीने बहीण-भाऊ वासखेडीकडे जात होते. या दरम्यान त्यांना पाठीमागून एका कारने धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की यात बहीण-भाऊ काही अंतरावर फेकले गेले. यामुळे या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

Sharad Pawar । आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! शरद पवारांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट

अपघातानंतर कारच्या काचा फोडून कारमधील लोक फरार झाले. या घटनेची माहिती मिळताच संतप्त नातेवाईक आणि ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत ठिय्या आंदोलन सुरू केले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. संतप्त जमावाने कार चालकाला अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. आरोपीवर लवकरात लवकर कारवाई होईल असे आश्वासन पोलिसांनी दिल्यानंतर नातेवाइकांनी सात तासांनंतर मृतदेह ताब्यात घेतले.

Baramati Loksabha । सुनंदा पवार यांचं खळबळजनक वक्तव्य’ म्हणाल्या, “दोन-तीन दिवसांमध्ये…”

Spread the love