Loksabha election । लोकसभा निवडणुकीत शरद पवार करणार सर्वात मोठा गेम!

Sharad Pawar

Loksabha election । सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीची (Loksabha election 2024) रणधुमाळी सुरु आहे. अनेक पक्ष त्यांच्या उमेदवारांची घोषणा करत आहेत. शरद पवार यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) ने महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यात भिवंडी लोकसभा मतदासंघासाठी सुरेश म्हात्रे (Suresh Mhatre) उर्फ बाळ्या मामा यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

Harshvardhan Patil । हर्षवर्धन पाटलांचे खळबळजनक वक्तव्य! म्हणाले; “अजित दादांच्या उमेदवाराला मी सांगतो म्हणून नाही तर…”

इतर लोकसभा मतदारसंघाप्रमाणे भिवंडी लोकसभा निवडणूक देखील अटीतटीची होऊ शकते. भिवंडीमध्ये भाजपनं कपिल पाटील (Kapil Patil) यांना उमेदवारी दिली आहे. (Suresh Mhatre vs Kapil Patil) 2009 मध्ये सुरेश म्हात्रे हे निवडणुकीसाठी उभे राहिले पण त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. तसेच 2018 मध्ये सुरेश म्हात्रे यांनी जिल्हा परिषद बांधकाम सभापती पदाची जबाबदारी दिली.

Pune Accident । ती रात्र काळ बनून आली, पुण्यात रात्रीच्या वेळी चालायला गेलेल्या दोन मित्रांचा भीषण अपघात; अपघाताचा थरारक Video व्हायरल

शिवाय 2019 मध्ये त्यांनी काँग्रेसकडे लोकसभेच्या उमेदवारीची मागणी केली. विशेष म्हणजे यासाठी त्यांना खुद्द शरद पवार यांनी मदत केली. शरद पवारांनी काँग्रेस पक्ष श्रेष्ठींना सांगूनही त्यांनी पक्षात थेट प्रवेश न केल्याने त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. सुरेश म्हात्रे यांनी स्वतःचे प्रकल्प निर्माण करून शेकडो बेरोजगार तरुणांना नोकरी दिली. त्यांनी शिवसेनेत फूट पडल्यानंतर काही काळ शिंदे गटात काम केले. पण ते पुन्हा एकदा शरद पवार गटात सहभागी झाले.

Manoj Jarange Patil । मनोज जरांगे पाटलांचा धक्कादायक गौप्यस्फोट! आंदोलनातील व्यक्तीला दिलं 15 लाखांचं आमिष?

Spread the love