Maharashtra Politics । लोकसभेपूर्वी पुन्हा ठाकरे गटाला मोठा धक्का, पदाधिकाऱ्यांसह माजी मंत्री करणार शिंदे गटात प्रवेश

Maharashtra Politics

Maharashtra Politics । राज्यात लवकरच लोकसभेच्या निवडणुका (Loksabha election 2024) पार पडणार आहेत. एकीकडे राजकीय पक्ष आपापल्या उमेदवारांच्या याद्या जाहीर करत आहेत तर दुसरीकडे तिकीट नाकारल्याने काही नेते पक्षांतर करत आहेत. अशातच आता लोकसभेपूर्वी ठाकरे गटाला (Thackeray group) मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. पदाधिकाऱ्यांसह माजी मंत्री शिंदे गटात प्रवेश करणार आहे.

Loksabha election । लोकसभा निवडणुकीत शरद पवार करणार सर्वात मोठा गेम!

सूत्रांच्या माहितीनुसार, नाशिकमधील ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री बबनराव घोलप (Babanrao Gholap) यांचा आज संध्याकाळी चार वाजता वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत प्रवेश होणार आहे. मागील काही दिवसांपासून ते शिर्डीच्या उमेदवारीत डावल्याने ठाकरे गटात नाराज होते. त्यामुळे त्यांनी शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

Harshvardhan Patil । हर्षवर्धन पाटलांचे खळबळजनक वक्तव्य! म्हणाले; “अजित दादांच्या उमेदवाराला मी सांगतो म्हणून नाही तर…”

भाऊसाहेब चौधरी यांच्या मध्यस्थीने बबनराव घोलप शिंदे गटात प्रवेश करणार आहे. शिवाय घोलप यांच्यासोबत आणखी काही पदाधिकारी शिंदे प्रवेश करणार आहे. दरम्यान, बबनराव घोलप यांचे पुत्र योगेश घोलप उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची साथ सोडणार की नाही याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. पण निवडणुकीपूर्वी ठाकरे गटाला सर्वात मोठा धक्का बसला आहे.

Pune Accident । ती रात्र काळ बनून आली, पुण्यात रात्रीच्या वेळी चालायला गेलेल्या दोन मित्रांचा भीषण अपघात; अपघाताचा थरारक Video व्हायरल

Spread the love