Harshvardhan Patil । हर्षवर्धन पाटलांचे खळबळजनक वक्तव्य! म्हणाले; “अजित दादांच्या उमेदवाराला मी सांगतो म्हणून नाही तर…”

Harshvardhan Patil

Harshvardhan Patil । इंदापूर : बारामतीकरांना यंदा पवार विरुद्ध पवार असा संघर्ष पाहायला मिळणार आहे. अटीतटीच्या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. आगामी निवडणुकीच्या तोंडावर खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Supriya Sule vs Sunetra Pawar) तयारीला लागल्या आहेत. नुकतेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत इंदापूरमध्ये मेळाव्याचे आयोजन केले होते. (Loksabha election)

Pune Accident । ती रात्र काळ बनून आली, पुण्यात रात्रीच्या वेळी चालायला गेलेल्या दोन मित्रांचा भीषण अपघात; अपघाताचा थरारक Video व्हायरल

या मेळाव्याला भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी देखील हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी बोलताना अजित पवारांच्या उमेदवाराला मी सांगतो म्हणून नाही तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सांगण्यावर इंदापूरच्या जनतेने पाठिंबा द्यावा, असे वक्तव्य हर्षवर्धन पाटील यांनी केले. त्यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Manoj Jarange Patil । मनोज जरांगे पाटलांचा धक्कादायक गौप्यस्फोट! आंदोलनातील व्यक्तीला दिलं 15 लाखांचं आमिष?

“बारामतीत फूट पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दोन गटांची नेमकी किती ताकद आहे, याच्याशी आम्हाला देणंघेणं नाही. आमचे चार-पाच प्रश्न असून ग्रामपंचायतीमधील आमच्या कार्यकर्त्यांना निधी मिळत नाही. सरपंच अवैध ठरवण्यात येतात. आम्ही गावांमध्ये मतं मागायला जातो, त्यावेळी लोकांना काय सांगणार? इंदापूर तालुक्यात भ्रष्टाचार वाढला आहे,” असाही दावा हर्षवर्धन पाटील यांनी केला.

Pappu Yadav । मोठी बातमी! भरसभेत ‘हा’ नेता रडला ढसाढसा, केला सर्वात मोठा खुलासा

Spread the love