Viral Video । सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक पोलिस कर्मचारी ट्रॅफिकमध्ये उभा राहून काही कागदोपत्री काम करताना दिसत आहे. तेवढ्यात एक माणूस येतो आणि लाल Ferrariत बसतो. Ferrari च्या पुढच्या टायरजवळ एक पोलीस उभा आहे. अशा परिस्थितीत, व्यक्ती Ferrari सुरू करतो आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. गाडीच्या टायरचा स्पर्श पोलिस कर्मचाऱ्याला होतो. यानंतर पोलीस कर्मचारी चांगलाच संतापल्याचे दिसते.
Pune News । पुण्यात ऑनड्युटी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यासोबत घडलं भयानक; मेंदूत रक्तस्त्राव होऊन…
आधी तो गाडीच्या काचा फोडतो. यानंतर, तो कारमध्ये बसलेल्या व्यक्तीला बाहेर काढतो. आणि त्याला मारायला लागतो. काही वेळातच दुसरा पोलिसही येतो. दोघेही त्या व्यक्तीला रस्त्यावर झोपवतात आणि मारहाण करण्यास सुरुवात करतात. तिथे उपस्थित लोक याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट करतात. @crazyclipsonly नावाच्या अकाऊंटवरून X सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केलेला हा व्हिडिओ आतापर्यंत जवळपास 1.5 कोटी वेळा पाहिला गेला आहे.
लोक मजेशीर कमेंट करत आहेत
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओवर विविध प्रकारच्या कमेंट येत आहेत. कमेंट करताना एका युजरने लिहिले आहे की , ‘त्याला चालान मिळाले असते तर ते स्वस्त झाले असते. दुसर्या व्यक्तीने कमेंट करून लिहिले, ‘अमेरिकन न्यायाबद्दल मला हेच आवडते, तुम्ही गरीब असो वा श्रीमंत, यात काही फरक नाही.’ अशा अनेक वेगेवेगळ्या कमेंट यावर येत आहेत.
Ferrari owner drives over police officer’s foot then gets pulled out of his car and arrested pic.twitter.com/Qzm3iDswvr
— Crazy Clips (@crazyclipsonly) January 9, 2024