Sharad Pawar । आमदार अपात्रता निकालावर शरद पवार यांनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजूनही उद्धव ठाकरेंना…”

Sharad Pawar

Sharad Pawar । राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बाजूने खूप मोठा निकाल दिला आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे बहुमत असून त्यांचा पक्षच हा मूळ शिवसेना पक्ष आहे, उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा खूप मोठा झटका मानला जात आहे. राहुल नार्वेकरांच्या या निकालानंतर ठाकरे गटाची पुन्हा कायदेशीर लढाई सुरु होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Shiv Sena MLA Disqualification। सर्वात मोठी बातमी! शिंदे की ठाकरे? शिवसेना पक्ष कोणाचा? विधानसभा अध्यक्षांचा मोठा निर्णय!

राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयामुळे शिंदे गटामध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. दरम्यान आता आमदार अपात्रता प्रकरणावरील निकालावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. या निकालानंतर जर उद्धव ठाकरे सुप्रीम कोर्टामध्ये गेले तर त्या ठिकाणी त्यांना न्याय मिळण्याची खात्री आहे, असं वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे.

Shiv Sena MLAs Disqualification Verdict । आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! विधानसभा अध्यक्षांचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का

ठाकरे गटाचं प्रतित्रज्ञापत्र अमान्य

दरम्यान, 2018 ची पक्षाची घटना ग्राह्य धरली जाणार नाही, कारण निवडणूक आयोगाकडे याची कोणतीही नोंद नाही. केवळ 1999 ची घटना ग्राह्य धरली जाईल. निवडणूक आयोगाच्या नोंदीमध्ये शिंदे गट ही खरी शिवसेना असून निवडणूक आयोगानं दिलेली घटनेची प्रत वैध आहे. 2023 मध्ये निवडणूक आयोगाकडून शिवसेनेच्या घटनेची प्रत मिळाली. ठाकरे उलटतपासणीला आले नाहीत, म्हणून ठाकरे गटाचं प्रतित्रज्ञापत्र अमान्य आहे, असे स्पष्टीकरण नार्वेकरांनी दिले आहे.

Cabinet Decision । आमदार अपात्रतेच्या निकालापूर्वी मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक, घेतले ‘हे’ महत्वाचे निर्णय

Spread the love