Uddhav Thackeray । ब्रेकिंग! सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया; पत्रकार परिषदेत केले मोठे वक्तव्य

Uddhav Thackeray

Uddhav Thackeray । शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर (Shiv Sena MLA disqualification case) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी आज अंतिम निकाल जाहीर केला आहे. विधानसभा अध्यक्षांनी या निकालातून ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.एकनाथ शिंदे यांचा पक्षच मूळ शिवसेना पक्ष असल्याचं राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे. यामुळे राज्याचे राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. आता यावर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Shiv Sena MLA Disqualification। सर्वात मोठी बातमी! शिंदे की ठाकरे? शिवसेना पक्ष कोणाचा? विधानसभा अध्यक्षांचा मोठा निर्णय!

आमच्या मागे महाशक्ती आहे. आम्ही सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा जुमानत नाही, हे आजच्या त्यांच्या (राहुल नार्वेकर) निकालातून दिसून आले आहे, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. सुप्रीम कोर्टात हा निर्णय टिकणार नाही, असंही ते यावेळी म्हणाले आहेत. पत्रकार परिषद घेत त्यांनी नार्वेकर यांना लक्ष्य केलं आहे.

Cabinet Decision । आमदार अपात्रतेच्या निकालापूर्वी मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक, घेतले ‘हे’ महत्वाचे निर्णय

त्याचबरोबर पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “न्यायालयाने काय निर्देश दिलेले आहेत? काय चौकट दिलेली आहे? त्या चौकटीच्या अंतर्गत काय निर्णय घ्यायला पाहिजे? अथवा काय चौकशी करायला पाहिजे? हे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले होते. ते संपूर्णपणे पायदळी तुडवले असल्याचे देखील त्यांनी यावेळी म्हंटले आहे.

Maratha Reservation । अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्याविरोधात मराठा समाज आक्रमक, दिला मोठा इशारा

Spread the love