Aditya Thackeray । दुचाकीची धडक, अपघातग्रस्त तरुणांच्या मदतीला धावले आदित्य ठाकरे

Adity Thackeray

Aditya Thackeray । काल आदित्य ठाकरे कोल्हापूर दौऱ्यावर होते यावेळी दौऱ्यावरून परतताना त्यांचा ताफा सातारा महामार्गावर असताना दुचाकीचा अपघात झाला होता. यावेळी आदित्य ठाकरे यांनी आपला ताफा थांबवून अपघातग्रस्त युवककाला मदत केली आहे. यामुळे सरकारवर कायम टीका करणाऱ्या आदित्य ठाकरे यांचा संवेदनशील स्वभाव देखील दिसून आला आहे. (Accident News )

Viral Video । गाडीचा स्पर्श झाला म्हणून पोलीस कर्मचाऱ्याला राग अनावर, गाडीच्या काचा फोडून मालकाला केली बेदम मारहाण; पाहा भयानक व्हिडीओ

आदित्य ठाकरे यांचा ताफा सातारा महामार्गावर असताना कराड नाक्याच्या पुढे एका दुचाकीस्वाराचा अपघात झाला होता. ही गोष्ट आदित्य ठाकरे यांच्या लक्षात आली. त्यावेळी त्यांनी आपला ताफा थांबवला आणि दुचाकी स्वाराच्या मदतीला धावले. यावेळी आदित्य ठाकरे यांनी अपघात ग्रस्त झालेल्या तरुणाची विचारपूस केली आणि त्यानंतर त्यांनी वाहतूक पोलिसांना देखील फोन केला.

Viral Video । चोरीचा आरोप, बॉईज हॉस्टेलमध्ये दोन मित्रांमध्ये तुफान हाणामारी; पाहा Video

सुदैवाने या अपघातात तरुण किरकोळ जखमी झाला होता. दरम्यान आदित्य ठाकरे यांनी त्याला उपचारासाठी रुग्णवाहिकेची व्यवस्था करून देत शिवसैनिकांच्या आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने जखमी युवकाला रुग्णालयामध्ये दाखल केले. दोन दुचाकींची एकमेकांना धडक झाल्याने हा अपघात घडला असल्याची देखील माहिती समोर आली आहे.

Pune News । पुण्यात ऑनड्युटी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यासोबत घडलं भयानक; मेंदूत रक्तस्त्राव होऊन…

Spread the love