Viral News । डॉक्टरचे धक्कादायक कृत्य, हायड्रोसेल ऑपरेशनसाठी आलेल्या रुग्णाची केली नसबंदी

viral news

Viral News । सध्या एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे हायड्रोसेल ऑपरेशनऐवजी नसबंदी ऑपरेशन करण्यात आले, ज्यामुळे रुग्णांच्या कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. ही घटना बिहारमधील मुंगेरमध्ये घडली आहे. यामुळे तेथील परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. हायड्रोसेल ऑपरेशनऐवजी नसबंदी केल्याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत.

Chandrasekhar Bawankule । चंद्रशेखर बावनकुळेंचं सर्वात मोठं वक्तव्य; म्हणाले, “संविधान बदलणार…”

पीडितेचे कुटुंबीय डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत आहेत. या घटनेमुळे कुटुंबीयांमध्ये मोठे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मुंगेर जिल्ह्यातील जमालपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात 4 मार्च रोजी हायड्रोसेल ऑपरेशनऐवजी नसबंदी करण्यात आल्याने या प्रकरणाने जोर पकडला आहे. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत जिल्हा दंडाधिकारी अवनीश कुमार सिंह यांनी शनिवारी तपासाचे आदेश दिले आहेत.

Maharashtra Politics । धक्कादायक बातमी! शिंदे गटाच्या ५ विद्यमान खासदारांची उमेदवारी धोक्यात?

संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आरोग्य विभागाला तपास पथक तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तपास पथकाच्या अहवालानंतर दोषीवर कडक कारवाई केली जाईल. डॉक्टरांनी एवढा निष्काळजीपणा कसा केला याचाही तपास केला जाईल. पीडित रुग्ण आणि त्याच्या कुटुंबीयांनी संबंधित डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्याची तयारी केली आहे.

Shahaji Bapu Patil । ब्रेकिंग! आमदार शहाजी बापू पाटील यांना सर्वात मोठा धक्का!

Spread the love