Shahaji Bapu Patil । ब्रेकिंग! आमदार शहाजी बापू पाटील यांना सर्वात मोठा धक्का!

Shahaji Bapu Patil

Shahaji Bapu Patil । सध्या सर्वत्र आपल्याला लोकसभा निवडणुकीची धामधूम पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) तोंडावर अनेक राजकीय पक्षांमध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. अनेक बडे नेते देखील पक्षांतर करत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. सध्या देखील शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांना मोठा धक्का बसण्याचे संकेत मिळत आहेत.

Topers Ad

Maharashtra Lok Sabha । “… तर निवडणुका बॅलेट पेपरवर होणार”, निवडणूक आयोगाने दिली महत्त्वाची माहिती

माहितीनुसार, शहाजी पाटील यांचे पुतणे संग्रामसिंह पाटील हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. संग्राम सिंह पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर त्यांनी लवकरच पक्षप्रवेश करणार असल्याची देखील माहिती दिली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Loksabha Elections । उमेदवारी मिळताच रवींद्र धंगेकरांची मोठी खेळी! निवडणुकीपूर्वीच भाजपला बसला धक्का

आमदार शहाजी बापू पाटील यांचे पुतणे संग्राम पाटील यांनी पुण्यामध्ये शरद पवार यांची भेट घेतली. त्याचबरोबर ते लवकरच राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती दिली. त्याचबरोबर यावेळी बोलताना त्यांनी स्वतः शहाजी बापू पाटील हे शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करतील असा मोठा गौप्यस्फोट केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Baramti News । धक्कादायक! बारामती गँगवार प्रकरणात मोठी अपडेट

Spread the love