Maharashtra Politics । केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) कार्यक्रमाची घोषणा केली आहे. महाराष्ट्रामध्ये २६ एप्रिल, ७ मे, १३ मे, २० मे आणि २५ मे या तारखांना मतदान पार पडणार आहे. महायुतीच्या जागांवर देखील शिक्कामोर्तब झाला आहे. पण शिंदे गटाच्या ५ विद्यमान खासदारांचं तिकीट धोक्यात आलं आहे. (Latest marathi news)
Shahaji Bapu Patil । ब्रेकिंग! आमदार शहाजी बापू पाटील यांना सर्वात मोठा धक्का!
भाजप (BJP) हायकमांडने शिंदे गटाला १३ जागा सोडण्यास सहमती दर्शवली असली तरी यातील ५ जागांवरील उमेदवार बदलावे लागतील, अशी अट घातली आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या ५ विद्यमान खासदारांची उमेदवारी धोक्यात आली आहे, असे बोलले जात आहे. लोकसभा निवडणुका पार पडण्यापूर्वीच भाजप शिंदे गटाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
Maharashtra Lok Sabha । “… तर निवडणुका बॅलेट पेपरवर होणार”, निवडणूक आयोगाने दिली महत्त्वाची माहिती
दरम्यान सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपला लोकसभेच्या ३० जागा मिळणार आहे. तर शिंदे गटाला १३ जागा, अजित पवार गटाला ४ जागा आणि मनसेला १ जागा मिळणार आहे. आजही भाजपकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे. या यादीत राज्यातील काही उमेदवारांच्या नावांचा समावेश असणार आहे.
Loksabha Elections । उमेदवारी मिळताच रवींद्र धंगेकरांची मोठी खेळी! निवडणुकीपूर्वीच भाजपला बसला धक्का