Viral News । मुलगा झाला हैवान! बापाला केली लाथा-बुक्यांनी मारहाण, वृद्धाचा जागीच मृत्यू; पाहा धक्कादायक व्हिडीओ

Viral News

Viral News । सोशल मीडियावर (Social media) एक अत्यंत धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, जो पाहून कोणाचेही रक्त उकळेल. यामध्ये एक तरुण आपल्या वृद्ध वडिलांना बेदम मारहाण करताना दिसत आहे. मालमत्तेच्या ध्यास घेतलेल्या मुलाने वडिलांना ज्या प्रकारे धक्काबुक्की केली ते पाहून तुम्हाला राग येईल. या वृद्धाचा मृत्यू झाल्याचे देखील सांगण्यात येत आहे.

Sharad Pawar । शरद पवारांना बसणार मोठा धक्का; जवळचा नेता सोडणार साथ

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, वृद्ध व्यक्ती घराबाहेर खुर्चीवर बसली होती, तेव्हा मुलगा आला आणि त्याला मारहाण करू लागला. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की जोरात ठोसा मारल्यानंतर वृद्ध व्यक्ती बेशुद्ध पडू लागतो, परंतु क्रूर मुलाचे यावर समाधान होत नाही आणि तो वडिलांच्या चेहऱ्यावर पायाने वार करतो. हा व्हिडिओ कर्नाटकातील असल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे.

Crime News । सोशल मीडियावरच प्रेम तरुणाला पडलं महागात, तरूणीचा नको त्या अवस्थेत व्हिडीओ कॉल आणि..

या अत्यंत त्रासदायक व्हिडिओमध्ये मुलगा आपल्या वृद्ध वडिलांना १५ सेकंदात २५ वेळा धक्काबुक्की करत असल्याचे दिसून येते. तो थकला की लाथही मारतो. मात्र, त्यानंतर दुसरी व्यक्ती त्याला पकडून दुसऱ्या बाजूला घेऊन जाते. हा व्हिडिओ पाहून सोशल मीडिया यूजर्स संतापले आहेत. अनेकांनी व्हिडिओ शेअर करून हे कलियुग असल्याचे लिहिले आहे.

Viral News । बहिणीच्या हळदीत नाचताना मुलीचा जागीच मृत्यू, व्हिडीओ पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Spread the love