Loksabha Elections । भाजपला मोठं खिंडार, मोहिते पाटलांनंतर बड्या नेत्याचा राजीनामा

Loksabha Elections

Loksabha Elections । मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडीमध्ये इनकमिंग वाढली आहे. महायुतीमध्ये अनेक नाराज असलेले नेते महाविकास आघाडीला पाठिंबा देताना दिसत आहेत. अशातच पश्चिम महाराष्ट्रात भाजपला (BJP) पुन्हा धक्का बसला आहे. मोहिते पाटलांनंतर (Mohite Patil) बड्या नेत्याने राजीनामा दिला आहे. त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे.

Sharad Pawar । शरद पवारांचा भाजपाला पुन्हा मोठा धक्का, निष्ठावंत नेता करणार पक्षात प्रवेश

भाजपचे जतचे माजी आमदार विलासराव जगताप (Vilasrao Jagtap) यांनी आपल्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. तसेच विलासराव जगताप यांनी विशाल पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे. काहीच दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जगताप यांची भेट घेत चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्याची विनंती केली होती.

Congress । काँग्रेसचं वाढलं टेन्शन! बड्या नेत्यानं घेतली फडणवीसांची भेट

दरम्यान, भाजपने सांगलीमधून संजयकाका पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे विलासराव जगताप नाराज झाले होते. भाजपला त्यांनी इशारा देखील दिला होता. विलासराव जगताप यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन आपली भूमिका जाहीर केली. आगामी निवडणुकीत विलासराव जगताप यांच्या भूमिकेमुळे संजयकाका पाटील यांच्या अडचणी वाढणार आहे.

Navneet Kaur Rana । नवनीत राणांना मोठा धक्का! निवडणूक आयोगाने केली कारवाई, नेमकं कारण काय?

Spread the love