Sharad Pawar । शरद पवारांचा भाजपाला पुन्हा मोठा धक्का, निष्ठावंत नेता करणार पक्षात प्रवेश

Sharad Pawar

Sharad Pawar । अवघ्या काही दिवसांवर लोकसभा निवडणुका (Loksabha 2024) येऊन ठेपल्या आहेत. निवडणुकीच्या तोंडावर सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. राज्यात कोणाची सत्ता येईल? हे येत्या काळात चित्र स्पष्ट होईल. दरम्यान, राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. खासदार शरद पवारांनी भाजपाला (BJP) आणखी एक मोठा धक्का दिला आहे. (Latest marathi news)

Congress । काँग्रेसचं वाढलं टेन्शन! बड्या नेत्यानं घेतली फडणवीसांची भेट

आज भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नामदेव ताकवणे (Namdev Takwane) हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश करणार आहेत. भाजपचे एकनिष्ठ नेते म्हणून नामदेव ताकवणे यांची ओळख आहे. पण आज यवत मधील सभेत शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये नामदेव ताकवणे पक्षात प्रवेश करणार आहेत. राहुल कुल (Rahul Kul) यांच्यावर भीमा पाटस साखर कारखाना प्रकरणी ताकवणे यांनी गंभीर आरोप केले होते.

Navneet Kaur Rana । नवनीत राणांना मोठा धक्का! निवडणूक आयोगाने केली कारवाई, नेमकं कारण काय?

राहुल कुल हेच भाजपात असल्याने ताकवणे हे पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जातोय. याचा निवडणुकीवर मोठा परिणाम होऊ शकतो. तसेच पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचे वंशज भुषणसिंह राजे होळकर शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत.

Politics News । निवडणुकीपूर्वी वंचितला मोठा धक्का! जिल्हाध्यक्षांचा पक्षाला रामराम

Spread the love