Navneet Kaur Rana । नवनीत राणांना मोठा धक्का! निवडणूक आयोगाने केली कारवाई, नेमकं कारण काय?

Navneet Kaur Rana

Navneet Kaur Rana । संपूर्ण राज्यात लोकसभेच्या निवडणुकांची (Loksabha election) जोरात तयारी सुरु आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीने आपापल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पण काही जागांवर तिढा कायम आहे. भाजपने (BJP) अमरावती मतदारसंघातून नवनीत राणा यांना उमेदवारी दिली आहे. पण नवनीत राणा यांना निवडणुकीपूर्वी मोठा धक्का बसला आहे.

Politics News । निवडणुकीपूर्वी वंचितला मोठा धक्का! जिल्हाध्यक्षांचा पक्षाला रामराम

निवडणूक आयोगाने (Election Commission) नवनीत राणा यांचे बॅनर काढून टाकले आहेत. विनापरवाना बॅनर लावल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यामधील तळवेल ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये हे बॅनर लावले होते. विशेष म्हणजे या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सध्या या प्रकारची सगळीकडे चर्चा सुरु आहे.

Sangli Loksabha Election । मोठी बातमी! काँग्रेसचा महाविकास आघाडीच्या मेळाव्यावर बहिष्कार

तळवेल ग्रामपंचायतीची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता बॅनर लावण्यात आले होते. तळवेल हे काँग्रेसचे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष बबलू देशमुख यांचे गाव आहे. या ठिकाणी काँग्रेसची सत्ता आहे. ग्रामपंचायतीवर काँग्रेसची सत्ता असल्याने हा प्रकार घडला आहे, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. यावर भाजप कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Loksabha Election 2024 । शरद पवारांची मोठी खेळी! बडा नेता करणार शरद पवार गटात प्रवेश

Spread the love