Congress । काँग्रेसचं वाढलं टेन्शन! बड्या नेत्यानं घेतली फडणवीसांची भेट

Congress

Congress । पुणे : अवघ्या काही दिवसांवर लोकसभा निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. निवडणुकीच्या तोंडावर सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. राज्यात कोणाची सत्ता येईल? हे येत्या काळात चित्र स्पष्ट होईल. दरम्यान, महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) जागावाटप केले आहे. असे असले तरीही महाविकास आघाडीमध्ये काही जागांवर तिढा कायम आहे.

Navneet Kaur Rana । नवनीत राणांना मोठा धक्का! निवडणूक आयोगाने केली कारवाई, नेमकं कारण काय?

काँग्रेसने रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना उमेदवारी दिली आहे. पण काँग्रेस नेते आबा बागूल (Aaba Bagul) हे पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छूक होते. पण उमेदवारी नाकारल्याने आबा बागूल नाराज आहेत. त्यांनी काँग्रेस भवनात आंदोलन केले होते. आता ते भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरु आहे. बागूल यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली आहे.

Politics News । निवडणुकीपूर्वी वंचितला मोठा धक्का! जिल्हाध्यक्षांचा पक्षाला रामराम

त्यामुळे आता पक्षात नाराज असलेले आबा बागूल कोणती भूमिका घेणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. तसेच सांगलीत ठाकरे गटाने महाविकास आघाडीच्या मेळाव्याचे आयोजन केलं आहे. सांगलीतील विष्णूदास भावे नाट्यगृहात चंद्राहार पाटील यांच्या प्रचारार्थ मेळावा आयोजित केला आहे. पण काँग्रेसने त्यावर बहिष्कार टाकला आहे. सांगलीत काँग्रेस नेते विशाल पाटील यांची नाराज असून ते अपक्ष अर्ज दाखल करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Sangli Loksabha Election । मोठी बातमी! काँग्रेसचा महाविकास आघाडीच्या मेळाव्यावर बहिष्कार

Spread the love