Vijay Shivatare । ब्रेकिंग! विजय शिवतारे यांनी जाहीर केला सर्वात मोठा निर्णय

Vijay Shivtare

Vijay Shivatare । लोकसभा निवडणुकांची घोषणा झाल्यापासून बारामती लोकसभा मतदारसंघ चांगलाच चर्चेत आहे. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये अजित पवार यांना शिवसेना नेते विजय शिवतारे टक्कर देणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. दरम्यान आता बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी भूमिका जाहीर केली आहे. बारामती या ठिकाणी अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा विजय शिवतारे यांनी केली आहे.

Manoj Jarange Patil । मनोज जरांगेंचं खळबळजनक विधान, म्हणाले; “मला तडीपार…”

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात वेगळी भूमिका घेत आज विजय शिवतारे यांनी घोषणा केली आहे. विजय शिवतारे 12 एप्रिलला 12 वाजता लोकसभेचा अपक्ष अर्ज भरणार असल्याची देखील माहिती समोर आली आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे बारामतीत तिरंगी लढत होणार आहे. सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार यांच्या लढाईमध्ये आता विजय शिवतारे देखील आले आहेत. त्यामुळे या मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

Abhijeet Bichukale । निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अभिजीत बिचुकलेंची सर्वात मोठी घोषणा

विजय शिवतारे यांनी रविवारी कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर लोकसभा लढवण्याचा निर्णय जाहीर केला. माध्यमांसमोर त्यांनी याबाबत माहिती दिली, त्याचबरोबर यावेळी त्यांनी अजित पवार आणि शरद पवार यांच्यावर देखील जोरदार टीका केली आहे.

Viral News । डॉक्टरचे धक्कादायक कृत्य, हायड्रोसेल ऑपरेशनसाठी आलेल्या रुग्णाची केली नसबंदी

Spread the love