Manoj Jarange Patil । मनोज जरांगेंचं खळबळजनक विधान, म्हणाले; “मला तडीपार…”

Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil । लोकसभा निवडणुकीवरून (Loksabha election) राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. आगामी निवडणुकीत जनता कोणाला निवडून देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. मराठा समाजाला आरक्षण न दिल्याने मराठा समाजासह मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी अंतरवाली सराटीतील निर्णायक बैठकीपूर्वी महत्त्वाचं विधान केलं आहे. (Maratha reservation)

Topers Ad

Abhijeet Bichukale । निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अभिजीत बिचुकलेंची सर्वात मोठी घोषणा

“मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. मी कोणत्याही बदनामीला सामोरं जाण्यास तयार आहे. मी मरेपर्यंत मराठा समाजाच्या बाजूनं उभं राहील. बऱ्याच दिवसांपासूनराज्य सरकारकडून गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. पण आता बैठका घेतल्या तरी गुन्हे दाखल होत आहेत. ते आणखी दहा पंधरा गुन्हे दाखल करून मला ते राज्यातून तडीपार करणार आहेत,” असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. (Antarwali Sarati Maratha Meeting)

Viral News । डॉक्टरचे धक्कादायक कृत्य, हायड्रोसेल ऑपरेशनसाठी आलेल्या रुग्णाची केली नसबंदी

“जर माझ्यावर कितीही गुन्हे दाखल झाले, तरीही मी मराठा समाजाशी नातं तुटू देणार नाही. अजूनही वेळ गेली नाही. सरकारने लवकरात लवकर सगेसोयरे अधिसूचना काढून कायदा करावा, असं आवाहन देखील मनोज जरांगे यांनी सरकारला केलं आहे. यावर आता सरकार कोणता निर्णय घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Chandrasekhar Bawankule । चंद्रशेखर बावनकुळेंचं सर्वात मोठं वक्तव्य; म्हणाले, “संविधान बदलणार…”

Spread the love