Vaishnavi Hagavane Suicide Case । वैष्णवीच्या मृत्यूनंतर हगवणे पिता-पुत्र फरार; तपासात धक्कादायक माहिती समोर

Vaishnavi Hagavane Suicide Case

Vaishnavi Hagavane Suicide Case । वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात तपास अधिक खोलात जात असून, मुख्य आरोपी राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा सुशील हगवणे अद्याप फरार आहेत. त्यांच्यावर हुंड्यासाठी छळ आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे गंभीर आरोप असून, पोलिसांकडून त्यांच्यावर शोधमोहीम सुरू आहे. बावधन पोलिसांनी यासाठी दोन विशेष पथके परराज्यात पाठवली आहेत. मात्र आरोपींच्या हालचाली गुप्त ठेवल्यामुळे अटक करणे अधिक कठीण बनले आहे.

Farmer News । शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारची सर्वात मोठी घोषणा

या प्रकरणाने केवळ एक तरुणीचा जीव घेतला नाही, तर तिच्या मागे १० महिन्यांचे बाळ देखील आईविना उरले आहे. ही बालक आपल्या आईच्या मुळ कस्पटे कुटुंबाकडे सुपूर्द करण्यात आले असून, या घटनेनंतर वैष्णवीच्या वडिलांनी आरोपींना तातडीच्या अटकेची मागणी केली आहे.

Havaman Andaj । सावधान, महाराष्ट्रात पुढील चार दिवस अवकाळी पावसासह गारपिटीचा इशारा; ‘या’ ठिकाणी अलर्ट जारी

या प्रकरणात वैष्णवीचा पती शशांक, सासू लता आणि नणंद करिष्मा हगवणे यांना अटक करण्यात आली असून त्यांची पोलीस कोठडी २६ मेपर्यंत वाढवण्यात आली आहे. सध्या ५१ तोळे सोनं गहाण ठेवून मिळालेल्या पैशांचा उपयोग नेमका कुठे आणि कशासाठी करण्यात आला, याचा तपास सुरू आहे.

Ssc Result । दहावीचा निकाल जाहीर! पुन्हा मुलींची आघाडी; राज्यभरात ९४.१० टक्के यश

Spread the love