
Farmer News । राज्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीजपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी राज्य सरकारने धोरणात्मक निर्णय घेतल्याचे फडणवीस यांनी सांगितले. आतापर्यंत ४ हजार मेगावॅट वीज निर्मिती पूर्ण झाली असून, केंद्र सरकारच्या कुसुम योजनेस राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री सौर कृषी योजना’ची जोड दिली आहे. एकूण १६ हजार मेगावॅट वीज निर्मितीचे उद्दिष्ट असून, २०२६ अखेरपर्यंत शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज उपलब्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विदर्भ व मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी नळगंगा-वैनगंगा नदीजोड प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होणार आहे. देशातील सर्वात मोठा नदीजोड प्रकल्प म्हणून याकडे पाहिले जात असून, तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाद्वारे सुमारे ३५ टीएमसी पाणी समुद्रात जाण्याऐवजी उपयोगात आणले जाईल. याचा बुलढाणा, अकोला आणि अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा लाभ होणार आहे.
कृषी क्षेत्राच्या बळकटीसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवन योजना जागतिक बँकेच्या सहकार्याने राबवली जात आहे. सुरुवातीच्या टप्प्यात ५ हजार गावांमध्ये यशस्वी अंमलबजावणीनंतर, आता ही योजना ७५०० गावांमध्ये एकात्मिक पद्धतीने राबवली जाणार आहे.
India Pakistan War । सर्वात मोठी बातमी! भारतीय सीमेच्या दिशेने सरकत आहे पाकिस्तानी आर्मी, अलर्ट जारी
राज्यातील शेतीसाठी शेतमजुरांची कमतरता ही मोठी अडचण असल्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितले. या समस्येवर उपाय म्हणून शेतीचे यांत्रिकीकरण गरजेचे असून, ते शेतकऱ्यांना परवडेल अशा स्वरूपात पोहोचवावे, अशी मागणी त्यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.