Pankaj Tripathi । अभिनेते पंकज त्रिपाठी यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर; जवळच्या व्यक्तीचे झाले अपघातात निधन

Pankaj Tripathi

Pankaj Tripathi । सध्या एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बॉलीवूड अभिनेते पंकज त्रिपाठी यांची बहीण आणि मेहुणा रस्त्यावर अपघाताचे बळी ठरले आहेत. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोघेही बिहारमधील गोपालगंजमधील कमालपूर येथून निरसा येथे येत होते. पंकज त्रिपाठी यांचे मेहुणे राजेश तिवारी (Rajesh Tiwari) उर्फ ​​मुन्ना तिवारी हे कार चालवत होते तर बहीण सविता या कारमध्ये बसल्या होत्या.

Lok Sabha Election । निवडणुकीपूर्वी पुन्हा महाविकास आघाडीला मोठा धक्का! ‘या’ आमदाराने दिला राजीनामा

निरसा येथील अपघातानंतर दोघेही जखमी झाले. त्यांनतर दोघांनाही तातडीने एसएनएमसीएच रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र पंकज त्रिपाठी यांचा मेहुणा मुन्ना तिवारी यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. दरम्यान, त्यांची बहीण सरिता जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल आहे.

Rohit Pawar । “अजित पवारांना भाजपनं लोकल नेता बनवलं,” रोहित पवारांची जहरी टीका

पंकज त्रिपाठी यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला

धनबाद येथील रुग्णालयातील सहकारी आणि त्याच्या नातेवाईकांनी सांगितले की, राजेश तिवारी उर्फ ​​मुन्ना तिवारी पत्नी सविता तिवारीसह बिहारमधील गोपालगंजमधील कमालपूर गावातून चित्तरंजनकडे जात होते. राजेश तिवारी स्वतःची कार चालवत होते, तर त्यांची पत्नी देखील त्यांच्या सोबत होती. त्यांच्या कारला NH 19 वर धनबादहून बंगालकडे जात असताना निरसा बाजार येथे अपघात झाला. त्यांची कार सुमारे तीन फूट रुंद दुभाजकावर आदळली. गाडीची अवस्था पाहता ती भरधाव वेगाने दुभाजकावर आदळली असावी असे वाटत आहे.

Ahmednagar Loksabha | अहमदनगरमध्ये सुजय विखेंच्या कार्यकर्त्यांनी निलेश लंकेच्या कार्यकर्त्याला केली जबर मारहाण; ब्लेडनेही केले वार

Spread the love