OBC Meeting । मराठा आरक्षण अधिसूचनेविरोधात छगन भुजबळ आक्रमक, बैठकीत घेतला मोठा निर्णय

OBC Meeting

OBC Meeting । मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) निर्णयावरून ओबीसी समाज (OBC) चांगलाच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेविरोधात आता ओबीसी नेते तीव्र नाराज झाले आहेत. ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी कोर्टात जाण्याची तयारी दर्शवली आहे.याच संदर्भात नुकतीच छगन भुजबळ यांच्या सिद्धगड निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक पार पडली. (Latest marathi news)

Maldives parliament । मोठी बातमी! संसदेत दोन खासदारांमध्ये तुफान हाणामारी; एकजण रुग्णालयात दाखल

या बैठकीला माजी मंत्री राम शिंदे, आमदार गोपीचंद पडळकर, माजी सनदी अधिकारी महेश झगडे, आगरी समाजाचे नेते राजाराम पाटील, दशरथ पाटील, सत्संग मुंडे उपस्थित होते. पक्ष अभिनिवेश बाजूला ठेऊन सगळे ओबीसी म्हणून एक होऊन काम करण्याची गरज आहे, असा निर्धार यावेळी या नेत्यांनी व्यक्त केला आहे. बैठकीत 3 महत्त्वाचे ठराव झाले. (OBC Reservation)

Bigg Boss । बिग बॉस 17 चा विजेता मुनव्वर फारुकीला ट्रॉफीसोबत किती पैसे मिळाले? जाणून घ्या

ओबीसी बैठकीतील ठराव

  • महाराष्ट्र सरकार नियुक्त न्या. संदीप शिंदे समिती ही असंविधानी आहे. मागासवर्ग आयोग नसताना मराठा – कुणबी / कुणबी – मराठा जात नोंदींचा शोध घेऊन कोणत्याही मागासवर्ग आयोगाने (राज्य किंवा राष्ट्रीय आयोग) मराठा समाजाला मागास ठरविलेले नसताना समितीच्या शिफारशीवरून प्रशासनाकडून मराठा कुणबी प्रमाणपत्रांचे वितरण केले जात असून मराठा – कुणबी / कुणबी – मराठा प्रमाणपत्रांचे वितरणाला स्थगिती द्यावी.
  • मराठा आरक्षणा संदर्भात सरकारने सगेसोयरे या शब्दाची व्याख्या बदलून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी राजपत्र असाधारण भाग चार ब दिनांक २६ जानेवारी २०२४ नुसार मसूदा काढला आहे. सरकारचा हा निर्णय मूळ ओबीसीवर अन्याय करणारा असल्याने दि.२६ जानेवारी २०२४ च्या राजपत्राचा मसूदा रद्द करावा.
  • भारतीय संविधानातील आर्टिकल 338 (ब) प्रमाणे उपरोक्त निकालाच्या आधारे संबंधित जाती घटकाबाबत आसक्ती नसणारे सदस्य नियुक्त करणे अपेक्षित असताना मा. न्या. सुनील सुक्रे, ओमप्रकाश जाधव, प्रा. अंबादास मोहिते या मराठा आरक्षण या विषयाबाबत आसक्ती असणाऱ्या व्यक्तींचा मागासवर्ग आयोगावर बेकायदेशीर पध्दतीने नियुक्त्या केल्या. मागासवर्ग आयोगाचे सदस्य आणि अध्यक्ष हे इंदिरा सहानी खटल्यातील निकालाप्रमाणे निगडित जातीशी आसक्ती असलेले नसावेत असे अपेक्षित असताना मागासवर्ग आयोगाचे नवनियुक्त अध्यक्ष सुनील शुक्रे हे मराठा समाजाचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. म्हणून राज्य मागासवर्ग आयोग आणि न्यायमुर्ती शिंदे समिती रद्द करण्यात यावी, असे तीन ठराव करण्यात आले.

Manoj Jarange Patil । …तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, जरांगे पाटलांनी केलं स्पष्ट

Spread the love