Maldives parliament । मोठी बातमी! संसदेत दोन खासदारांमध्ये तुफान हाणामारी; एकजण रुग्णालयात दाखल

Maldiv News

Maldives parliament । मालदीवच्या संसद भवनात रविवारी (२७ जानेवारी) सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षाच्या खासदारांमध्ये हाणामारी झाली, त्यामुळे कामकाज विस्कळीत झाले. सन ऑनलाइनच्या वृत्तानुसार, अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी बोलावलेल्या विशेष सत्रादरम्यान ही हाणामारी झाल्याची माहिती मिळत आहे. यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. (Clash in Maldives Parliament)

Bigg Boss । बिग बॉस 17 चा विजेता मुनव्वर फारुकीला ट्रॉफीसोबत किती पैसे मिळाले? जाणून घ्या

पीपल्स नॅशनल काँग्रेस (पीएनसी) आणि मालदीवच्या प्रोग्रेसिव्ह पार्टी (पीपीएम) चे समर्थन करणारे खासदार माजी अध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोलिह यांच्या नेतृत्वाखालील मालदीवियन डेमोक्रॅटिक पार्टी (एमडीपी) च्या विरोधात बाहेर पडले. एमडीपी खासदार ईसा आणि पीएनसी खासदार अब्दुल्ला शाहीम अब्दुल हकीम यांच्यात बाचाबाची झाली. शहीम अब्दुलने ईसाचे पाय धरले, त्यामुळे ते खाली पडले. यानंतर इसाने शाहीमच्या मानेवर लाथ मारली आणि या दोघांमध्ये हाणामारी झाली.

Bigg Boss । बिग बॉस 17 चा विजेता मुनव्वर फारुकीला ट्रॉफीसोबत किती पैसे मिळाले? जाणून घ्या

या घटनेनंतर अब्दुल्ला शाहीम अब्दुल हकीम हे जखमी झाले असून त्यांना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले. विरोधकांनी संसदेच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

Supriya Sule । “अध्यादेश काढण्यासाठी सरकारने वेळकाढूपणा केला”, सुप्रिया सुळेंचा सरकारवर घणाघात

Spread the love