India Alliance । इंडिया आघाडीला पुन्हा मोठा धक्का! नितीश कुमार यांच्यानंतर अरविंद केजरीवालांचा मोठा निर्णय

India Alliance

India Alliance । राज्यात लवकरच लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका (Election 2024) पार पडणार आहेत. भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) आगामी निडणुकीत हरवण्यासाठी इंडिया आघाडी एकत्र आली आहे. पण लोकसभा निवडणुका तोंडावर असताना इंडिया आघाडीला धक्क्यांवर धक्के बसत आहेत. काल मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी आघाडीतून माघार घेतली आहे. (Latest marathi news)

OBC Meeting । मराठा आरक्षण अधिसूचनेविरोधात छगन भुजबळ आक्रमक, बैठकीत घेतला मोठा निर्णय

या घटनेला काही तास झाले असताना इंडिया आघाडीला पुन्हा एक मोठा धक्का बसला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी हरियाणातील आगामी विधानसभा निवडणूक आप एकट्याने लढणार आहे, जाहीर केले आहे. हरिणायात विधानसभेच्या 90 जागा आहे. या जागा आप स्वबळावर लढणार आहे, अशी घोषणा केजरीवाल यांनी केली आहे.

Maldives parliament । मोठी बातमी! संसदेत दोन खासदारांमध्ये तुफान हाणामारी; एकजण रुग्णालयात दाखल

असे असले तरी या वर्षी होणाऱ्या आगामी निवडणुकीत आपण पक्ष इंडिया आघाडीसोबत लढणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या या घोषणेमुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. दरम्यान, मागील आठवड्यात तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणूक एकट्याने लढवणार आहे, अशी घोषणा केली होती.

Bigg Boss । बिग बॉस 17 चा विजेता मुनव्वर फारुकीला ट्रॉफीसोबत किती पैसे मिळाले? जाणून घ्या

Spread the love