Manoj Jarange Patil । …तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, जरांगे पाटलांनी केलं स्पष्ट

Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil । राज्य सरकारने (State Govt) मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. याबाबत काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याकडे जीआर सुपूर्द केला. कुणबी नोंदी मिळाल्या त्यांना आरक्षण मिळणार आहे. सगे सोयरे या शब्दात मराठ्याचा किती हित आहे, हे अगोदरच मी हेरल होते, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी मागण्या मान्य झाल्यानंतर दिली. (Latest maarthi news)

Pune Crime । धक्कादायक! IT इंजिनिअर महिलेचा गोळ्या झाडून खून, लॉजमध्ये सापडला मृतदेह

काल रात्री जरांगे अंतरवालीत पोहोचले. आज येथे त्यांनी मराठा समाजाची मोठी सभा घेतली. त्यावेळी त्यांनी बोलताना “आपलं हे आंदोलन सुरूच राहणार आहे, अशी घोषणा केली आहे. नव्या अध्यादेशानुसार जोपर्यंत एखाद्या मराठा समाजाच्या नोंदी नसणाऱ्या सोयऱ्याला कुणबीप्रमाणपत्र मिळत नाही, तोपर्यंत हे आंदोलन (Maratha reservation) यशस्वी झालं आणि नवीन कायद्याची अंमलबजावणी झाली असं म्हणता येणार नाही”, असे स्पष्ट केले.

Narayan Rane । नारायण राणेंचा अध्यादेशाला कडाडून विरोध, म्हणाले; “राज्य सरकारच्या निर्णयाशी सहमत नाही”

पुढे ते म्हणाले की, “सरकारने काल सगेसोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबतचा अध्यादेश काढला. ज्याची कुणबी म्हणून नोंद मिळाली आहे, त्याच्या नोंदीच्या आधारावर नोंद नसणार्या सोयऱ्याला त्या कागदपत्राच्या अंतर्गत एक तरी प्रमाणपत्र मिळायला हवं होत. हे प्रमाणपत्र मिळत नाही, तोपर्यंत हे आंदोलन राहणार आहे. प्रमाणपत्र मिळेल तेव्हा आपल्या लोकांचं कल्याण झालं असं समजता येईल,” असेही जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.

Supriya Sule । “अध्यादेश काढण्यासाठी सरकारने वेळकाढूपणा केला”, सुप्रिया सुळेंचा सरकारवर घणाघात

Spread the love