Lok Sabha Election । महायुतीत सुटला ‘त्या’ जागांचा तिढा! मध्यरात्रीच घेतला मोठा निर्णय

Lok Sabha Election

Lok Sabha Election । अवघ्या काही दिवसांवर लोकसभेच्या निवडणुका (Lok Sabha Election 2024) येऊन ठेपल्या आहेत. सर्व राजकीय पक्ष निवडणुकीच्या तोंडावर जय्यत तयारी करताना दिसत आहेत. पण अजूनही महायुतीच्या काही जागांवरील तिढा सुटला नव्हता. त्यासंदर्भात नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी महत्त्वाची बैठक घेतली.

Pune News । मोठी बातमी! भाजपच्या माजी नगरसेविकाचा होरपळून मृत्यू

सूत्रांच्या माहितीनुसार, या बैठकीत नाशिकची जागा अजित पवार गटाला देण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर आणि ठाण्याची जागा शिंदे गटाला देण्यात आली आहे. इतकेच नाही तर पालघरमध्ये राजेंद्र गावित (Rajendra Gavit) भाजपमध्ये प्रवेश करून कमळ चिन्हावर निवडणूक लढवतील. असे असले तरीही रत्नागिरी सिंधुदुर्ग जागेवरून शिंदे गट आणि भाजपमध्ये (BJP) रस्सीखेच सुरू आहे.

Prithviraj Chavan । साताऱ्याच्या जागेबाबत पृथ्वीराज चव्हाण यांचं सर्वात मोठं वक्तव्य, शरद पवारांना धक्का

त्याशिवाय, वाशिममध्ये शिंदे गटामधून राजश्री पाटील यांच्या उमेदवारीला विरोध सुरु असून पाच टर्मपासून यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच नेतृत्व करणाऱ्या खासदार भावना गवळी यांना उमेदवारी दिली नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. भावना गवळी यांच्यावर अन्याय होत आहे, असा आरोप शिंदे गटाचे वाशिम जिल्हा प्रमुख विजय खानझोडे यांनी केला आहे.

Sharad Pawar । ब्रेकिंग! माजी मुख्यमंत्र्याने तुतारीवर निवडणूक लढायला दिला नकार

Spread the love