Beed News । बीड हादरलं! शिंदे गटाच्या उपजिल्हाप्रमुखावर जीवघेणा हल्ला, 8 जणांनी गाडी अडवून केली बेदम मारहाण

Beed News

Beed News । बीड : एकीकडे लोकसभेच्या निवडणुकांची (Loksabha election) तयारी सुरु आहे तर दुसरीकडे बीडमधून (Beed) एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. शिंदे गटाच्या उपजिल्हाप्रमुखावर (Upazila Pramukh of Shinde group0 8 जणांनी गाडी अडवून जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. सुदैवाने या घटनेत कोणीतही जीवितहानी झाली नाही. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत. (Latest marathi news)

Lok Sabha Election । महायुतीत सुटला ‘त्या’ जागांचा तिढा! मध्यरात्रीच घेतला मोठा निर्णय

शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर खांडे (Dnyaneshwar Khande) हे बीडवरून म्हाळस जवळा या गावाकडे निघाले असता त्यांची वाटेतच सात ते आठ जणांनी गाडी अडवून लोखंडी रॉडने जबर मारहाण केली. बुधवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत ज्ञानेश्वर खांडे गंभीररित्या जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Attack on Dnyaneshwar Khande)

Pune News । मोठी बातमी! भाजपच्या माजी नगरसेविकाचा होरपळून मृत्यू

तसेच खांडे यांच्यासोबत असणाऱ्या इतर दोघांनाही मारहाण केली असून ते दोघेही या घटनेत जखमी झाले आहेत. त्यांच्यावर देखील उपचार सुरू आहेत. दरम्यान, हा हल्ला नेमका कोणी केला? कशासाठी केला? याचा कारण अजूनही अस्पष्ट आहे. या प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

Prithviraj Chavan । साताऱ्याच्या जागेबाबत पृथ्वीराज चव्हाण यांचं सर्वात मोठं वक्तव्य, शरद पवारांना धक्का

Spread the love