Pune News । मोठी बातमी! भाजपच्या माजी नगरसेविकाचा होरपळून मृत्यू

Pune News

Pune News । पुणे : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. भाजपच्या माजी नगरसेविकाचं (Former corporator of BJP) निधन झालं आहे. पुण्यातील वडगाव शेरी येथील भारतीय जनता पक्षाच्या माजी नगरसेविका शितल ज्ञानेश्वर शिंदे (वय ४१ वर्षे) यांचे (Shital Shinde) बुधवारी रात्री अकरा वाजता निधन झालं आहे. त्यांच्या जाण्याने राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त व्यक्त केली जात आहे. (Latest marathi news)

Prithviraj Chavan । साताऱ्याच्या जागेबाबत पृथ्वीराज चव्हाण यांचं सर्वात मोठं वक्तव्य, शरद पवारांना धक्का

याबाबत अधिक माहिती अशी की, वडगाव शेरीमधून दोन वेळा निवडून आलेले माजी नगरसेवक ज्ञानेश्वर शिंदे (Dnyaneshwar Shinde) यांच्या त्या पत्नी होत्या. एक महिन्यापूर्वी त्या अंगणामध्ये सॅनिटायझर टाकून पालापाचोळा पेटवत असताना सॅनिटायझरचा भडका झाल्याने भीषण आग लागली. या आगीत त्या गंभीररीत्या भाजल्या होत्या. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरु होते.

Sharad Pawar । ब्रेकिंग! माजी मुख्यमंत्र्याने तुतारीवर निवडणूक लढायला दिला नकार

काही दिवसांपूर्वी उपचारादरम्यान त्यांची प्रकृतीत सुधारणा झाली होती. पण त्यांना पुन्हा इन्फेक्शन झालं. त्यामुळे त्यांची आणखी बिघडली होती. अखेर त्यांनी ३ एप्रिल रात्री अकरा वाजता शेवटचा श्वास घेतला. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक विकासकामे केलीअसल्याने नागरिकांची त्यांना चांगली पसंती देखील मिळाली होती. त्यांच्या निधनामुळे पुणे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Bacchu Kadu । बच्चू कडूंनी कार्यकर्त्यांना केलं कळकळीचं आवाहन, म्हणाले; “माझ्या मायची शपथ…”

Spread the love