लग्नसराईचा (Marriage ceremony) हंगाम सुरु असल्याने सध्या सर्वत्र लग्नाच्या चर्चा सुरू आहेत. काही लग्नात गमतीशीर घटना घडत असतात, तर काही लग्नात धक्कादायक घटना घडत असतात. सध्या अशीच एक घटना घडली आहे. वाजत-गाजत नवरीला न्यायला वरात आली खरी, नवरदेवाचेही दणक्यात स्वागत झाले. पण वरपक्षाच्या एक मागणीमुळे त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले आहे. (Latest Marathi News)
मोदींना ‘ती’ गोष्ट पटली नसावी,’ शरद पवारांनी घेतला मोदींच्या टीकेचा खरपूस समाचार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरोंधा (Surondha) गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. शिवलाल यांच्या मुलीचे लग्न रैपुरा गावात राहत असणाऱ्या अजयसोबत ठरले होते. ठरलेल्या मुहूर्तानुसार वरपक्ष नववधूला न्यायला आला त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागतही झाले. परंतु नाचत असताना वरपक्षाने आपल्या आवडीचे गाणे लावले. आवडीचे गाणे न लावल्याने नशेत असणाऱ्या वरपक्षातील काही मंडळींनी डीजे वाल्याला मारहाण केली. वधूपक्षानेही त्यात उडी घेतली. हे प्रकरण पोलीस स्टेशनमध्ये गेले.
‘भिडेंना म्हातार चळ लागलीय’, भिडे गुरुजींच्या ‘त्या’ वक्तव्यावरून काँग्रेसने सुनावले खडे बोल
याबाबत वधूच्या वडिलांनी माहिती दिली असता, वरपक्षाने त्यांच्याकडे हुंड्याची मागणी केली होती असे सांगितले. वधूपक्षाने नकार देताच वरपक्ष जेवणात चुका काढायला लागला. इतकेच नाही तर त्यांनी डीजे वाल्याला मारहाण केली. याप्रकरणी वरपक्षाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.
शिंदे गटाला मोठा धक्का! हायकोर्टाने दिला ठाकरे गटाच्या बाजूने निकाल