‘मतांच्या विभाजनासाठी KCR यांची एन्ट्री; BRS भाजपची टीम बी’ संजय राऊत यांचा आरोप

Raut

BRS चे नेते आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (KCR) यांनी सर्व मंत्रिमंडळासह जोरदार शक्तिप्रदर्शन करत महाराष्ट्रात एन्ट्री केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) यांनी BRS पक्षात प्रवेश केला. भारतीय जनता पक्षानेही BRS ला पाठिंबा दिला. त्यावरून आता BRS पक्षाला विरोधकांच्या टीकेला सामोरे जावे लागत आहे. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी BRS आणि भाजपचा (BJP) खरपूस समाचार घेतला आहे.

वाजत-गाजत आली वरात अन् वरपक्षाने सांगितली ‘मन की बात’, पुढं जे घडलं ते ऐकून बसेल तुम्हालाही धक्का

बोलताना राऊत म्हणाले की, ‘महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपकडून अनेक बी टीम सी टीम बनवल्या जात आहेत. त्यांनी 2019 ला एमआयएम आणि आता 2024 साठी बीआरएसला (BRS) तयार करण्यात येत आहे. ते कधी मनसेला बी टीम बनवत आहेत तर कधी कुणाला. केसीआर यांची वकिली चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) कधीपासून करायला लागलेत. त्यांनी स्वत: च्या पक्षाकडे लक्ष द्यावे, अशा शब्दात राऊत यांनी सुनावले आहे.

‘मोदींना ‘ती’ गोष्ट पटली नसावी,’ शरद पवारांनी घेतला मोदींच्या टीकेचा खरपूस समाचार

पुढे ते म्हणाले,’ केसीआर यांनी तेलंगणातील जनतेच्या हितासाठी निर्णय घ्यावा. महाराष्ट्रातील जनतेसाठी निर्णय घेण्यासाठी त्यांना येथे येण्याची काहीच गरज नाही. तेलंगणाच्या शेजारील राज्यात BRS पक्ष नाही. परंतु ते महाराष्ट्रातच का येत आहेत? आगामी निवडणुकात महाविकास आघाडीला त्रास देण्यासाठी भाजपने त्यांना सुपारी दिली आहे, असा आरोप संजय राऊत यांनी यावेळी केला.

‘भिडेंना म्हातार चळ लागलीय’, भिडे गुरुजींच्या ‘त्या’ वक्तव्यावरून काँग्रेसने सुनावले खडे बोल

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *