राज्यात सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार (Sharad Pawar) असा संघर्ष पाहायला मिळत आहे. एका कार्य्रक्रमात बोलत असताना शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर (NCP) ७०,००० कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला. तसेच पवारांच्या मुलीचं भलं करायचं असेल तर तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मतदान करा, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावरून चांगलेच राजकारण तापले आहे. त्यांच्या या टीकेला शरद पवारांनी प्रत्युत्तर दिले आहे. (Latest Marathi News)
‘भिडेंना म्हातार चळ लागलीय’, भिडे गुरुजींच्या ‘त्या’ वक्तव्यावरून काँग्रेसने सुनावले खडे बोल
शरद पवार हे पुण्यातील (Pune) एका आयोजित कार्य्रक्रमात बोलत होते. त्यावेळी ते म्हणाले की, ‘ विरोधी पक्षनेते एकत्र येत आहेत. देशात असणाऱ्या वेगवगेळ्या समस्यांवर चर्चा करत आहेत. हीच गोष्ट मोदींना आवडली नसावी. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसबद्दल अशाप्रकारचे चुकीचे वक्तव्य केले. त्यामुळे त्यांनी केलेल्या वक्तव्याचा विचार करावा. त्यांनी माझ्याबाबत शिखर बँकेचा (Shikhar Bank) उल्लेख केला असून सर्वात महत्त्वाचे म्हणजे मी कधीच त्या बँकेचा सभासद नव्हतो आणि आजही नाही. त्यामुळे कर्ज घेण्याचा प्रश्न येत नाही. त्यामुळे याबाबत बोलणे योग्य आहे का? असा सवाल त्यांनी मोदींना विचारला आहे.
शिंदे गटाला मोठा धक्का! हायकोर्टाने दिला ठाकरे गटाच्या बाजूने निकाल
पुढे त्यांनी भगीरथ भालके यांच्या बीआरएस (BRS) पक्षप्रवेशावर प्रतिक्रिया दिली. ‘एखादी व्यक्ती दुसऱ्या पक्षात गेली तर काळजी करायची गरज नसते. भालके यांना आम्ही ज्या वेळेला विधानसभेला संधी दिली त्याच्यानंतर आमच्या असे लक्षात आले होते की आमची ही निवड चुकीची होती. त्यामुळे मला आता त्यावरून काही बोलायचे नाही,’ असे म्हणत त्यांच्यावर बोलणे पवारांनी टाळले.
किरण मानेंची ‘त्या’ तरुणांसाठी पोस्ट म्हणाले,’ मर्दुमकी दाखवल्याचा आव आणत…’