Indapur Well Accident । विहिरीत अडकलेल्या ‘त्या’ तीन कामगारांचे मृतहेद सापडले, एकाचा तपास सुरूच

The bodies of 'those' three workers trapped in the well were found, the investigation of one continues

Indapur Well Accident । इंदापूर : उशिरा का होईना परंतु राज्यात पावसाने थैमान (Heavy Rain) घातले आहे. मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असल्याने ठिकठिकाणी पेरण्यांची लगबग सुरु आहे. अशातच अनेक शेतकरी विहिरीला रिंग टाकणे तसेच विहिरीतील गाळ काढणे अशी कामे करत आहेत. परंतु विहिरीचे (Well) काम सुरु असताना एका धक्कादायक घटना घडली आहे. (Latest Marathi News)

Devendra Fadanvis । महापालिका निवडणुकांबाबत देवेंद्र फडणवीसांनी दिले थेट विरोधकांनाच आव्हान, म्हणाले; “सर्वजण एकत्र..”

इंदापूर (Indapur) तालुक्यातील म्हसोबावाडी गावात विहिरीचं काम सुरु असताना अचानक रिंग मारलेला स्लॅबचा भाग आणि मातीचा ढिगारा विहिरीत (Indapur Accident) कोसळला होता. त्याखाली चार मजूर अडकले होते. त्यापैकी तीन मजुरांचे मृतदेह शोधण्यात यश आले असून आणखी एक मजुर सापडत नाहीत तोपर्यंत रुग्णवाहिका घटनास्थळावरून जाऊ देणार नाही, अशी आक्रमक भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.

Meta Blocks News । मेटाचा मोठा धक्का! फेसबुक, इन्स्टाग्रामवरुन बातमी हद्दपार

काम सुरु असताना हे मजूर या ढिगाऱ्याखाली अडकले होते. सायंकाळी हे मजूर घरी न परतल्याने त्यांचा शोध घेतला जात होता. त्यांच्या दुचाक्या विहिरीजवळ आढळून आल्याने हे मजूर विहिरीत अडकल्याची भीती व्यक्त केली जात होती. अखेर चार मजुरांपैकी तिघांचा शोध लागला. परंतु या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Cancer । एक कप चहामुळे होतो कॅन्सर? जाणून घ्या यामागचं कारण

हे ही पहा

Spread the love