Devendra Fadanvis । महापालिका निवडणुकांबाबत देवेंद्र फडणवीसांनी दिले थेट विरोधकांनाच आव्हान, म्हणाले; “सर्वजण एकत्र..”

Regarding municipal elections, Devendra Fadnavis directly challenged the opposition, saying; "All together.."

Devendra Fadanvis । मुंबई : सध्या विधान परिषदेचे (Legislative Council) अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात विरोधी पक्ष सरकारला (Government) राज्यातील वेगवेगळ्या मुद्द्यांवरून घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्यात मागील काही दिवसांपासून राज्यातून महिला गायब होण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच मुंबईसह अनेक महापालिकांच्या निवडणुका (Mumbai Municipal Elections) रखडल्या असून यापैकी अनेक महापालिकांवर प्रशासक नेमला आहे. याच मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे. (Latest Marathi News)

Meta Blocks News । मेटाचा मोठा धक्का! फेसबुक, इन्स्टाग्रामवरुन बातमी हद्दपार

यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी खुलासा केला आहे. बोलताना ते म्हणाले की, “निवडणूक घेण्याचा कोणताही अधिकार हा राज्य सरकारला नाही. तर तो अधिकार निवडणूक आयोगाला (Election Commission) आहे. आम्हालाही या निवडणुका व्हाव्यात असे वाटत आहे. पाहिजे तर आपण सर्वजण आयोगाकडे एकत्र जाऊन निवडणूका घेण्याची मागणी करू, असे आव्हान फडणवीस यांनी विरोधकांना दिले आहे.

Cancer । एक कप चहामुळे होतो कॅन्सर? जाणून घ्या यामागचं कारण

एखादी महिला किंवा मुलं गायब होत असेल तर त्यासाठी 72 तासांत तक्रार द्यावी लागते. त्यांचे अपहरण केले किंवा पळवून नेले या दृष्टीने तपास केला जातो. यात महाराष्ट्र 12 व्या क्रमांकावर तर बाल लैंगिक गुन्ह्यांत 17 व्या क्रमांकावर आहे. महिलांना मुंबई ही इतर मोठ्या शहरांच्या तुलनेत सुरक्षित वाटते, असेदेखील देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Rohit Pawar । रोहित पवार करणार राम शिंदे यांचा शाल देऊन सत्कार; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Spread the love