Meta Blocks News । मेटाचा मोठा धक्का! फेसबुक, इन्स्टाग्रामवरुन बातमी हद्दपार

The big shock of Meta! Expulsion of news from Facebook, Instagram

Meta Blocks News । सध्याच्या काळात फेसबुक (Facebook), इन्स्टाग्राम (Instagram) यांसारख्या सोशल मीडियाचा (Social media) वापर मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे. हे दोन्ही प्लॅटफॉर्मची मालकी मेटाकडे (Meta) आहे. मेटा आपल्या वापरकर्त्यांसाठी सतत नवनवीन फीचर्स घेऊन येत असते, ज्याचा फायदा या वापरकर्त्यांना होतो. केवळ मनोरंजन आणि माहितीसाठीच या प्लॅटफॉर्मचा वापर होत नाही तर पैसे कमावण्यासाठीही या प्लॅटफॉर्मचा वापर होतो. (Latest Marathi News)

Cancer । एक कप चहामुळे होतो कॅन्सर? जाणून घ्या यामागचं कारण

असंख्य वापरकर्ते याचा वापर माहितीसाठी करत आहेत. यावर अनेकांना बातमीही पाहायला मिळते. परंतु आता याच वापरकर्त्यांना मेटाने मोठा धक्का दिला आहे. कारण त्यांना आता येथून पुढे बातम्या पाहता येणार नाहीत. कॅनडातील फेसबुक आणि इन्स्टाग्राम यापुढे या प्लॅटफॉर्मवर बातम्या पाहू शकत नाहीत. कारण मेटाने यावर शेअर करण्यात आलेल्या बातम्या ब्लॉक केल्या आहेत. (Meta Blocks News on Facebook and Instagram)

Rohit Pawar । रोहित पवार करणार राम शिंदे यांचा शाल देऊन सत्कार; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

त्याशिवाय लवकरच हा नवीन नियम गुगल आणि ट्विटरसह सर्व सोशल मीडियांना लागू करण्यात येणार आहे. दरम्यान, सोशल मीडिया कंपन्यांना बातम्यांच्या बदल्यात वृत्त प्रकाशकांना पैसे द्यावे लागणार आहेत, या कायद्याच्या निषेधात मेटाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

Delhi Services Bill । दिल्ली सरकारच्या अधिकारांना अडचणीत आणणारे विधेयक आज राज्यसभेत, कोण मारणार बाजी?

हा धक्का फक्त वापरकर्त्यांना बसला नाही तर माध्यम समूहांना देखील बसला आहे. जर या सोशल मीडियावर बातमी शेअर झाली नाही तर त्यांचे उत्पन्नही कमी होईल. साहजिकच मेटाच्या निर्णयामुळे पत्रकारांच्या नोकऱ्याही धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Nitin Desai Death । नितीन देसाई मृत्यू प्रकरणाची कसून चौकशी केली जाईल, अजित पवार यांचे आश्वासन

Spread the love