Palghar Accident । सध्या वडोदरा द्रुतगती महामार्ग बांधकाम सुरु आहे. जीआर इन्फ्रा कंपनीकडे (GR Infra Company) मार्ग बांधकामाचा ठेका घेण्यात आला आहे. सध्या द्रुतगती महामार्गासाठी वैतरणा नदीपात्रात पुलाचे बांधकाम सुरू आहे. कामगारांना नदीपात्रातून ने- आण करण्यासाठी स्टील प्रवासी बोट वापरण्यात येत आहे. काम करून परतणाऱ्या कामगारांसोबत मोठा अनर्थ घडला आहे. (Latest Marathi News)
Car Accident | समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! रुग्णवाहिकेची कारला जोरदार धडक; एकाचा जागीच मृत्यू
कामगारांना घेऊन येणारी बोट नदी पात्रात (Accident News) ही उलटली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वैतरणा नदी पात्रात वाढीव- वैतीपाडा जवळ ही दुर्घटना घडली आहे. नदीपात्रातून कामगार घेऊन येणाऱ्या या टंक बोटीत एका बाजूने कामगार बसल्याने बोट एका बाजूला पलटी झाली. आणि काही क्षणातच ही बोट नदी पात्रात बुडाली(Accident), अशी माहिती आहे. बोट बुडत असल्याचे समजताच बोटीतील काही कामगारांनी नदीपात्रात उड्या मारल्या.
या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार, पालघरचे प्रांताधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, मंडळ अधिकारी, सफाळे पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी कर्मचारी आणि राष्ट्रीय यंत्रणेने घटनास्थळी धाव घेतली. बोटीत असणाऱ्या २१ कामगारांना वाचवण्यात यश आले असून दोन कामगार अजूनही बेपत्ता आहेत. बोट, स्पीड बोट आणि इतर माध्यमांच्या मदतीने बेपत्ता असणाऱ्या दोन कामगारांचा शोध सध्या प्रशासकीय यंत्रणेकडून सुरु आहे.
Mumbai Crime । मुंबई हादरली! रेल्वे स्टेशनवर सूटकेसमध्ये सापडला महिलेचा मृतदेह