Pune Accident । ताबा सुटल्याने भरधाव टेम्पोनं अनेकांना चिरडलं, सात जण गंभीर जखमी

Pune Accident

Pune Accident । अपघातांच्या घटनेचा सपाटा काही केल्या संपत नाही. अपघात होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. दररोज कुठे ना कुठे अपघात घडल्याच्या घटना पाहायला मिळतात. सतत एकापेक्षा एक भीषण अपघाताच्या (Accident) घटना समोर येतात. सध्या असाच एक अपघात घडला आहे. ताबा सुटल्याने भरधाव टेम्पोनं अनेकांना चिरडलं आहे. (Accident News)

Palghar Accident । पुलाचे बांधकाम करणाऱ्या कामगारांची बोट बुडाली! २१ कामगार बचावले तर २ बेपत्ता

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील कोलाड महामार्गावर पिरंगुट घाटात हा अपघात झाला आहे. या घाटातील उतारावर एक टेम्पो सिमेंटच्या विटा घेऊन जात होता. परंतु, चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. या टेम्पोचा वेग खूप भरधाव होता. त्यामुळे त्या टेम्पोने पाच दुचाकी आणि एका चार चाकी वाहनांला धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती, की या अपघातात सात जण गंभीर जखमी झाले आहेत. (Latest Marathi News)

Car Accident | समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! रुग्णवाहिकेची कारला जोरदार धडक; एकाचा जागीच मृत्यू

सध्या जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेचे थरारक दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. दरम्यान, या घाटात सतत अवजड वाहनांचे अपघात घडत असतात. त्याकडे स्थानिक प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे, अशी तक्रार केली जात आहे. सततच्या अपघातांमुळे नागरिक आक्रमक झाले आहेत. परंतु, या घटनेनं परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे.

Assembly Election 2023 । निवडणुकीनंतर अशा प्रकारे होते EVM द्वारे मतमोजणी, जाणून घ्या याबाबत सविस्तर माहिती

Spread the love