Car Accident | समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! रुग्णवाहिकेची कारला जोरदार धडक; एकाचा जागीच मृत्यू

Car Accident

Car Accident | समृद्धी महामार्ग सुरू झाल्यापासून हा महामार्ग कायम चर्चेत आहे. समृद्धी महामार्गावर अपघात होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. दररोज अपघात झाल्याच्या घटना आपल्याला ऐकायला मिळतात. सध्या देखील या महामार्गावर अपघाताची एक भीषण घटना (Accident News) घडली आहे. महामार्गावर रुग्णवाहिकेने कारला जोरदार धडक दिल्याने या ठिकाणी मोठा अपघात झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की यामध्ये एक जणाचा जागीच मृत्यू झाला आहे. (Latest Marathi News)

Assembly Election 2023 । निवडणुकीनंतर अशा प्रकारे होते EVM द्वारे मतमोजणी, जाणून घ्या याबाबत सविस्तर माहिती

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गावर (Samruddhi Highway) वाशिम च्या मालेगाव (Malegaon) तालुक्यातील वनोजा ते कवरदरीच्या दरम्यान कार आणि रुग्णवाहिकेमध्ये अपघात (Car and ambulance accident) झाला आहे. रुग्णवाहिकेने कारला पाठीमागून जोरदार धडक दिली आणि हा भीषण अपघात झाला. यामध्ये एक जण जागीच ठार झाला असून नऊ जण जखमी झाले आहेत. जखमी मधील दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. या अपघातामुळे तेथील परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Mumbai Crime । मुंबई हादरली! रेल्वे स्टेशनवर सूटकेसमध्ये सापडला महिलेचा मृतदेह

अपघात नेमका कसा झाला?

एक कुटुंब कारमधून मुंबईला चालले होते. तर वाशिम जिल्ह्यातील वनोजा ते कवरदरी दरम्यानच्या समृद्धी महामार्गावर नागपूरहून सुरतला उपचारासाठी रुग्ण नेत असलेल्या रुग्णवाहिकेने पाठीमागून कारला जोरदार धडक दिली आणि हा भीषण अपघात झाला आहे. या अपघाताची माहिती मिळतात तेथील स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्यास सुरुवात केली. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

World Cup Final 2023 । फायनल गमावल्यानंतर रोहित शर्मा ढसाढसा रडला, सिराजलाही अश्रू अनावर, पाहा Video

Spread the love