Mumbai Crime । मुंबई हादरली! रेल्वे स्टेशनवर सूटकेसमध्ये सापडला महिलेचा मृतदेह

mumbai crime

Mumbai Crime । सध्या गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. यामध्ये देशाची राजधानी असलेल्या मुंबईमध्ये तर गुन्हेगारीच्या घटनांमध्ये जास्त वाढ झाली आहे. सध्या देखील एक धक्कादायक घटना मुंबईतील कुर्ला या ठिकाणी घडल्याचे उघडकीस आले आहे. कुर्ल्यामध्ये मेट्रोचे काम सुरू असलेल्या साईटवर एका पुलाखाली बंद सुटकेस आढळले आणि त्यामध्ये एका महिलेचा मृतदेह सापडला आहे. त्यामुळे सगळीकडे मोठी खळबळ उडाली आहे. (Mumbai Crime )

World Cup Final 2023 । फायनल गमावल्यानंतर रोहित शर्मा ढसाढसा रडला, सिराजलाही अश्रू अनावर, पाहा Video

या सुटकेसची माहिती मिळताच तपासासाठी गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि सुटकेस उघडताच त्यांना महिलेचा मृतदेह आढळल्याने सर्वजण हादरले. सुटकेसमध्ये मृत अवस्थेत असलेली महिला नेमकी कोण आहे? कोणत्या ठिकाणची आहे? याबाबत अजून माहिती मिळालेली नाही. मात्र तिचा मृतदेह रुग्णालयात दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

Hingoli Earthquake । ब्रेकिंग न्यूज! हिंगोली जिल्ह्यामध्ये २० ते २५ गावांमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी 19 नोव्हेंबर रोजी कुर्ला पोलीस ठाण्यात एक फोन आला सीएसटी रोड शांतीनगरच्या समोरील बाजूस मेट्रो रेल्वेच्या कामाच्या जागेवर बेवारस सुटकेस सापडल्याचे पोलिसांना सांगण्यात आले. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि सुटकेस उघडला तर त्यामध्ये महिलेचा मृतदेह आढळून आला. यानंतर त्यांनी पोस्टमार्टम साठी तो मृतदेह रुग्णालयात पाठवला असून पुढील तपास सुरू आहे.

Uttarakhand । 170 तास उलटूनही उत्तराखंडच्या बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांना बाहेर काढण्यास अपयश , बचावासाठी आणखी 4-5 दिवस लागणार?

Spread the love